नागपुरात महिला पोलीस शिपायाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:14 PM2021-06-10T23:14:43+5:302021-06-10T23:15:29+5:30

Woman police constable beaten ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या फरार आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांनी एका महिला पोलीस शिपायाला मारहाण केली.

Woman police constable beaten in Nagpur | नागपुरात महिला पोलीस शिपायाला मारहाण

नागपुरात महिला पोलीस शिपायाला मारहाण

Next
ठळक मुद्देसंशयित आरोपी आणि नातेवाईकांचा गोंधळ - प्रतापनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या फरार आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांनी एका महिला पोलीस शिपायाला मारहाण केली. तिचा हातही मुरगाळला. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी ही घटना घडली.

अक्षय ऊर्फ चिंटू अनिल मरस्कोल्हे (वय २६) हा वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या हत्यार प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी आहे. पोलिसांच्या लेखी तो फरार असल्याने सेलू ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे आपल्या पथकासह त्याला ताब्यात घेण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता नागपुरात आले. चिंटू गोपालनगरात राहतो. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रतापनगर पोलीस ठाण्यात आले. येथून काही पोलीस कर्मचारी सोबत घेऊन हे पथक गोपालनगरातील जुगलकिशोर ले-आऊटमध्ये पोहचले. त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच आरोपी चिंटू मरस्कोल्हे, वेणू मरस्कोल्हे, अंजली उईके, प्रज्ञा अनिल मरस्कोल्हे यांनी पोलिसांच्या कारवाईला तीव्र विरोध केला. त्यांना शिवीगाळ करून पोलिसांसोबत झोंबाझोंबी केली. पोलीस शिपायी रजनी देवढवळे (वय ३५) यांचा हात मुरगाळून त्यांना मारहाण केली. यामुळे एकच गोंधळ उडाला. परिसरातील बघे मोठ्या संख्येत तेथे जमा झाले. दरम्यान, पोलिसांनी अतिरिक्त बळ मागवून घेतले. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Woman police constable beaten in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.