नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याचा महिला पोलिसावर बलात्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:31 AM2018-05-27T00:31:09+5:302018-05-27T00:32:17+5:30

मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचाºयाने सोबत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केला. तब्बल दोन वर्षे शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नास नकार दिल्यामुळे हे प्रकरण ठाण्यात पोहचले. त्यामुळे शुक्रवारी रात्री या प्रकरणी मानकापूर ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचारी पवनसिंग विनोदसिंग ठाकूर (वय २७) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

Woman Police Costable raped by policemen in Nagpur | नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याचा महिला पोलिसावर बलात्कार 

नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याचा महिला पोलिसावर बलात्कार 

Next
ठळक मुद्देमानकापुरात गुन्हा दाखल : आरोपी फरार : पोलीस मुख्यालयात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याने सोबत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केला. तब्बल दोन वर्षे शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नास नकार दिल्यामुळे हे प्रकरण ठाण्यात पोहचले. त्यामुळे शुक्रवारी रात्री या प्रकरणी मानकापूर ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचारी पवनसिंग विनोदसिंग ठाकूर (वय २७) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.
आरोपी पोलीस ठाकूर आणि बलात्काराची तक्रार नोंदवणारी तरुणी (वय ३०) पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. कर्तव्यावर असताना झालेल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. १० फेब्रुवारी २०१६ ला ठाकूरने तिला आपले गोधनीतील सबिना सोसायटीत असलेले घर दाखवतो म्हणून सोबत नेले. तेथे त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध जोडले. यानंतर दोघांमध्ये दोन वर्षात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित झाले. लग्नाच्या आणाभाका घेणारे हे दोघे कधीकधी तरुणीच्या जरीपटक्यातील घरी जाऊनही शरीरसंबंध जोडू लागले. अलीकडे त्यांच्यात मतभेद झाले. लग्नाचा विषय काढताच तो टाळू लागल्याने त्यांच्यात ६ मे २०१८ ला कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतरही त्याने लग्न करावे म्हणून तरुणीने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्याने लग्नाला स्पष्ट नकार दिल्यामुळे तरुणीने शुक्रवारी मानकापूर ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवणारी तरुणी पोलीस आणि आरोपी कर्मचारीही पोलीस असल्याने वरिष्ठांसोबत सल्लामसलत करून ठाणेदार महेश चव्हाण यांनी लगेच आरोपी ठाकूरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
त्याची कुणकुण लागताच आरोपी पोलीस कर्मचारी फरार झाला. सध्या त्याची शेतकरी भवनात गार्ड ड्युटी लागली होती. तेथेही तो दोन दिवसांपासून गैरहजर असल्याचे समजते. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे पोलीस मुख्यालयात खळबळ उडाली आहे.

Web Title: Woman Police Costable raped by policemen in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.