भाडेकरूकडून महिलेवर बलात्कार

By admin | Published: May 17, 2016 02:14 AM2016-05-17T02:14:43+5:302016-05-17T02:14:43+5:30

बदनामीचा धाक दाखवून तब्बल दोन वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या भाडेकरू आरोपीविरुद्ध अखेर पीडित महिलेने तक्रार

Woman raped by tenants | भाडेकरूकडून महिलेवर बलात्कार

भाडेकरूकडून महिलेवर बलात्कार

Next

अश्लील क्लिप बनवून धमकी : दोन वर्षांनंतर तक्रार
नागपूर : बदनामीचा धाक दाखवून तब्बल दोन वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या भाडेकरू आरोपीविरुद्ध अखेर पीडित महिलेने तक्रार नोंदविली. त्यानुसार हुडकेश्वर पोलिसांनी अभिजित शेषराव हजारे (वय ३०) नामक आरोपीवर गुन्हा दाखल केला. आरोपी हजारे रोहणा (ता. काटोल) येथील रहिवासी आहे.
खासगी नोकरी करणारा आरोपी हजारे २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत हुडकेश्वरमधील एका भाड्याच्या घरात आई-वडिलांसह राहत होता. घरची महिला (वय २४) हजारे कुटुंबीयांसोबत आपुलकीने वागत होती. त्याचा त्याने गैरफायदा घेतला. ३१ डिसेंबर २०१४ ला थर्टी फर्स्टच्या कार्यक्रमाची संधी साधून त्याने घरात कुणी नसताना तिला गुंगीचे औषध दिले. तिच्यावर बलात्कार करून तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढले. मोबाईलने व्हिडिओ क्लिपही बनविली. हे फोटो आणि व्हिडिओ क्लिप दाखवून तो तिच्याशी वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित करीत होता. तिच्यावर दोन वर्षांत अनेकदा बलात्कार केल्यानंतर मार्च २०१६ मध्ये आरोपीने भाड्याचे घर सोडले आणि तो बहादुरा येथे राहायला गेला. त्यामुळे महिलेला दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)

अखेर नोंदविली तक्रार
त्याचे लग्न दुसरीकडे जुळल्याचे कळाल्याने पीडित महिलेने पिच्छा सुटला म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र आरोपीने तिला अलीकडे फोन करून धमकावणे सुरू केले. यापुढेही अनैतिक संबंध असेच सुरू ठेवण्यासाठी महिलेवर दबाव आणू लागला. नकार दिल्याने त्याने तिला बदनामीची धमकी दिली. परिणामी पीडित महिला प्रचंड दडपणात आली. याचवेळी पतीने तिला विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार त्याला सांगितला. बराच विचार केल्यानंतर पती-पत्नीने हुडकेश्वर ठाण्यात रविवारी तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक एस.सी. गवई यांनी आरोपी हजारेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Woman raped by tenants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.