कुऱ्हाड हल्ल्यात महिला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:22+5:302021-02-23T04:14:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : पाळीव कुत्र्याने घरासमाेर घाण केल्याने वादाला ताेंड फुटले. भांडण शमल्यानंतर शेजाऱ्याने घरात शिरून महिलेवर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : पाळीव कुत्र्याने घरासमाेर घाण केल्याने वादाला ताेंड फुटले. भांडण शमल्यानंतर शेजाऱ्याने घरात शिरून महिलेवर कुऱ्हाडीने वार केल्याने ती महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघाेडा येथे साेमवारी (दि. २२) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली असून, आराेपीस अटक करण्यात आली आहे.
सोनू मोहन उईके (वय ४८) असे गंभीर जखमी महिलेचे नाव असून, इंदरलाल झनकलाल नवरे (४५) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. दाेघेही वाघाेडा (ता. सावनेर) येथील झाेपडपट्टीत शेजारी राहतात. साेनू उईके यांनी कुत्रा पाळला आहे. त्या कुत्र्याने इंदरलालच्या घराच्या दारासमाेर घाण केल्याने त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे साेनू व इंदरलाल यांच्यात भांडणाला सुरुवात झाली.
काही वेळाने त्यांचे भांडण शांत झाले. त्यानंतर इंदरलाल साेनू यांच्या घरात शिरला आणि त्याने घरातच साेनू यांच्या डाेके, मान व पाठीवर कुऱ्हाडीने वार केले. गंभीर दुखापत झाल्याने त्या खाली काेसळल्या. हा प्रकार लक्षात येताच साेनू उईके यांच्या शेजारी फुलकुमारी धर्मेंद्र यादव यांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून जखमी साेनू यांना सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था करण्यात आली.
त्यांच्या शरीरावर नऊ खाेल जखमा असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. इशरत शेख यांनी दिली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी फुलकुमारी यादव यांच्या तक्रारीवरून भादंवि ३०७, ४५२, ५०४ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी इंदरलाल नवरे यास अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर करीत आहेत.