महिलेस चाकूच्या धाकावर भरदिवसा लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:11 AM2021-08-15T04:11:47+5:302021-08-15T04:11:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : तिघांना घरात शिरून चाकूचा धाक दाखविला व महिलेकडील साेन्याचे दागिने व राेख रक्कम असा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तिघांना घरात शिरून चाकूचा धाक दाखविला व महिलेकडील साेन्याचे दागिने व राेख रक्कम असा एकूण १२ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून तिला लुटले. ही घटना कामठी शहरातील रमानगरात शनिवारी (दि. १४) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. तिन्ही आराेपींची ओळख पटल्याची माहिती ठाणेदार विजय मलचे यांनी दिली.
बादल संतापे (२६), सागर कांबळे (२८) व सचिन शेंडे (१८) तिघेही रा. रमानगर, कामठी अशी आराेपींची नावे आहेत. माला राजेश पाटील (२६, रा. रमानगर, कामठी) या शनिवारी सायंकाळी त्यांच्या घरी एकट्याच बसून हाेत्या. त्यातच काही कळण्याच्या आता तिन्ही आराेपींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यातील एकाचे त्यांच्यावर चाकू राेखला तर दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील ११ हजार रुपये किमतीचे साेन्याचे मंगळसूत्र व जवळील एक हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर तिघांनीही तिथून पळ काढला.
माला पाटील यांनी लगेच पाेलिसात तक्रार दाखल केली. तिघेही रमानगर, कामठी भागातील रहिवासी असल्याने ते माला पाटील व त्यांच्या शेजाऱ्यांच्या ओळखीचे हाेते. त्यामुळे चाेरट्यांची लवकरच ओळख पटली, अशी माहिती ठाणेदार विजय मलचे यांनी दिली. आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३९२, ४५७, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद धोंगडे करीत आहेत.