विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
By admin | Published: June 25, 2016 03:04 AM2016-06-25T03:04:30+5:302016-06-25T03:04:30+5:30
कूलरच्या टबमध्ये पाणी भरताना विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात महिलेचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या महिलेच्या कडेवर असलेली तीन वर्षीय बालिका थोडक्यात बचावली.
कामठीतील घटना : बालिका बचावली
कामठी : कूलरच्या टबमध्ये पाणी भरताना विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात महिलेचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या महिलेच्या कडेवर असलेली तीन वर्षीय बालिका थोडक्यात बचावली. ही घटना कामठी शहरातील छत्रपतीनगर भागात गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
हर्षा रोशन सोमकुवर (२७, रा. छत्रपतीनगर, कामठी) असे मृत महिलेचे नाव आहे. हर्षाने तिची तीन वर्षीय मुलगी शाश्वती हिला कडेवर घेऊन घरी असलेल्या कूलरमध्ये पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कूलरचा वीजप्रवाह सुरू होता. कूलरमध्ये पाणी टाकताच हर्षाला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यामुळे शाश्वती फेकल्या गेली.
हा प्रकार लक्षात येताच घरच्या मंडळींनी हर्षा व शाश्वतीला लगेच स्थानिक खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती हर्षाला मृत घोषित केले. शाश्वतीवर उपचार सुरू आहे. या प्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)