महिलेच्या हातातून एक लाख पळविले

By admin | Published: February 24, 2016 03:24 AM2016-02-24T03:24:13+5:302016-02-24T03:24:13+5:30

पायी जात असलेल्या महिलेच्या हातातील एक लाखाची रोकड असलेली पिशवी दोन लुटारूंनी हिसकावून नेली.

The woman's hand caught one lakh | महिलेच्या हातातून एक लाख पळविले

महिलेच्या हातातून एक लाख पळविले

Next

शांतीनगर रेल्वे क्रॉसिंगजवळील घटना : बँकेतूनही २८ हजार लंपास
नागपूर : पायी जात असलेल्या महिलेच्या हातातील एक लाखाची रोकड असलेली पिशवी दोन लुटारूंनी हिसकावून नेली. तर, बँकेत बसलेल्या महिलेच्या हातातून एका लुटारूने २८,५०० रुपये पळविले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी या घटना घडल्या.
डिप्टी सिग्नल कळमना येथील सलेदबाई ईश्वर गिल्हूर (वय ४०) यांनी काही दिवसांपूर्वी ओळखीच्या व्यक्तीकडून एक लाख रुपये उधार घेतले होते. ते परत करण्यासाठी त्या सोमवारी दुपारी १ च्या सुमारास त्या व्यक्तीकडे जात होत्या. हनुमान मंदिरजवळ, शांतीनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ दोन आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यांनी सलेदबाईच्या हातातील पिशवी हिसकावून पळ काढला. पिशवीत एक लाखाची रोकड होती. ती लुटली गेल्यामुळे सलेदबाई मदतीसाठी आरडाओरड करू लागल्या. आजूबाजूची मंडळी जमली. त्यांना सलेदबाईने घडलेली घटना सांगितली. मात्र, मदतीचा हात मिळेपर्यंत आरोपी नजरेआड झाले होते.
दुसरी घटना बँक आॅफ महाराष्ट्रच्या वर्धमाननगर शाखेत दुपारी १२.१५ ला घडली. भांडेवाडी पारडी येथील संगीता संजय चव्हाण (वय ३०) यांनी बँकेतून ५० हजार रुपये काढले. पती येणार असल्यामुळे त्या बँकेतच वाट बघत बसल्या. तेवढ्यात तेथे एकजण आला. तुमच्या जवळच्या नोटा नकली आहेत, मलाही अशाच नकली नोटा बँकेतून मिळाल्या, असे सांगत आरोपींनी आपल्या जवळच्या चार नोटा संगीता यांच्यासमोर धरल्या. तेवढ्यात आणखी काही जण तसेच सांगू लागले. ‘तुमच्या नोटा तपासून घ्या’ असे म्हणत आरोपींनी संगीता यांच्याजवळचे ५० हजारांचे बंडल ताब्यात घेतले. तेवढ्यात दोघांनी संगीतांचे लक्ष विचलित केले आणि नोटा तपासण्याचा बनाव करणाऱ्या आरोपीने ५० हजारातील तब्बल २८,५०० रुपये स्वत:च्या खिशात घालून उर्वरित २१,५०० रुपये संगीता यांच्या हातात ठेवले. नोटा बरोबर आहे, असे म्हणत आरोपी निघून गेले. एका पाठोपाठ दोन महिला रक्कम लंपास केल्याची तक्रार घेऊन लकडगंज ठाण्यात आल्या. पोलिसांनी दोन्हीच्या तक्रारी नोंदवून घेतल्या. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी बँक तसेच रेल्वेक्रॉसिंग जवळच्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The woman's hand caught one lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.