नागपुरात  गिफ्टच्या बहाण्याने महिला अधिकाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 09:11 PM2018-02-28T21:11:15+5:302018-02-28T21:11:40+5:30

एका महिला अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्रीद्वारे आपल्या जाळ्यात ओढले आणि साडे तीन लाखांचा चुना लावला. सक्करदरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Woman's Officers cheated by giving a gift in Nagpur | नागपुरात  गिफ्टच्या बहाण्याने महिला अधिकाऱ्याची फसवणूक

नागपुरात  गिफ्टच्या बहाण्याने महिला अधिकाऱ्याची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपवर झाली ओळख : सायबर गुन्हेगारांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका महिला अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्रीद्वारे आपल्या जाळ्यात ओढले आणि साडे तीन लाखांचा चुना लावला. सक्करदरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार सोमवारी क्वॉर्टर येथील प्रीती या शासकीय विभागात कार्यरत आहेत. त्यांची व्हॉट्सअ‍ॅपवरील एका वैवाहिक ग्रुपवर ब्रिटनमधील आरोपी रॉजर विलियम्स याच्याशी ओळख झाली. विलियम्सने स्वत:ला तो अनिवासी भारतीय असल्याचे सांगितले. यानंतर विलियम्स तिच्याशी संपर्क साधू लागला. दोघांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर बोलणे होत होते. यादरम्यान विलिनाईन विलियम्स नावाच्या एका महिलेने प्रीतीशी संपर्क साधला.ती विलियम्सची बहीण असल्याचे तिने सांगितले. तसेच तिने प्रीतीसाठी एक गिफ्ट पार्सल पाठवले असल्याचेही सांगत प्रीतीबाबतची विस्तृत माहिती विचारली. प्रीतीनेही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सविस्तर माहिती दिली. संपूर्ण माहिती विचारून घेतल्यावर विलिनाईनने प्रीतीला सांगितले की, तिने तारा एक्स्प्रेस सर्व्हिस कुरियरद्वारे गिफ्ट पार्सल पाठवले आहे. याच्या दोनचार दिवसानंतर प्रीतीला राजीव कुमार नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वत:ची ओळख कस्टम आॅफिसर म्हणून दिली. प्रीतीला एक बँक अकाऊंटचा नंबर देऊन त्यात २६ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. यानंतर प्रीतीला ई-मेल पाठवून पैसे जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर कुरियरमध्ये ८ लाख ६० हजार रुपये येतात. त्याचे खाते अपडेट नसल्याने ही रक्कम ट्रान्सफर होत नाही आहे. त्याने खाते अपडेट करण्याच्या बहाण्याने पैसे जमा करण्यास सांगितले. यानंतर हे प्रकरण मिनिस्ट्री आॅफ फायनान्समध्ये जाईल. तिथून क्लियरन्स घेण्यासाठी ७९ हजार रुपये जमा करावे लागेल. प्रीतीने राजीव कुमारने सांगितल्यानुसार ‘इंटरनेट बँकिंग’च्या माध्यमातून ३ लाख ५६ हजार रुपये जमा केले. यानंतरही राजीवद्वारे पैसे मागितले जात असल्यामुळे तिला संशय आला. प्रीतीने विलियम्स व राजीव कुमारला आपले पैसे परत करण्यास सांगितले. यानंतर त्यांनी संपर्क बंद केला.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे प्रीतीच्या लक्षात आले. त्यांनी सायबर सेलमध्ये तक्रार केली. प्राथमिक चौकशीनंतर हे प्रकरण सक्करदरा पोलिसांकडे सोपवण्यात आले. सक्करदरा पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी हे दिल्लीचे असल्याचे सांगितले जाते. त्यांचे मोबाईल व बँक खात्यावरून याची माहिती मिळते. पीएसआय डी.के. धडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आठवड्याभरातील दुसरी घटना
एका आठवड्यातील या प्रकारची ही दुसरी घटना आहे. सीताबर्डी येथील ममता कालबेडे नावाच्या शिक्षिकेला ख्रिसमस उपचाराच्या नावावर १.१४ लाखाने फसवण्यात आले होते. या प्रकरणातही कस्टम आॅफिसर म्हणून फसवण्यात आले होते. शिक्षित महिलाच याला बळी पडत आहेत.

 

Web Title: Woman's Officers cheated by giving a gift in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.