महिला काँग्रेसने पेटविली चूल गॅस दरवाढीचा निषेध :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:39 AM2017-10-08T01:39:30+5:302017-10-08T01:39:40+5:30

पेट्रोल, डिझेल दरवाढीसोबतच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ नागपूर शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी शनिवारी चुलीवर स्वयंपाक केला.

Women Congress protest against petrol chaos gas price hike: | महिला काँग्रेसने पेटविली चूल गॅस दरवाढीचा निषेध :

महिला काँग्रेसने पेटविली चूल गॅस दरवाढीचा निषेध :

googlenewsNext
ठळक मुद्देउदयनगर चौकात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल, डिझेल दरवाढीसोबतच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ नागपूर शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी शनिवारी चुलीवर स्वयंपाक केला. उदयनगर चौकात झालेल्या या आंदोलनात महिलांनी वाढत्या महागाईवर रोष व्यक्त करीत आम्ही घर कसे चालवायचे, असा सवाल सरकारला केला.
महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी समोर रिकामे गॅस सिलेंडर ठेवून चूल पेटविली. केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. या वेळी बडवाईक म्हणाल्या, केंद्र सरकार गॅस सिलेंडरचे भाव पाच रुपयांनी वाढल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात ही वाढ ५० ते ७० रुपयांची आहे. सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळी तोंडावर आहे. अशा परिस्थितीत गॅसची दरवाढ गृहिणींचे बजेट बिघडवणारी आहे. यात कमी म्हणून की काय आता भारनियमनही सुरू होण्याची शक्यता आहे. अदानी, अंबानी यासारख्या उद्योगपतींकडून महागडी वीज विकत घेण्यासाठी भारनियमन लादले जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.
आंदोलनात प्रदेश सचिव शिल्पा जवादे, कल्पना फुलबांधे, संगीता उपरीकर, रजनी राऊत, बेबी गौरीकर, शिल्पा बोडखे यांच्यासह महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या.
 

Web Title: Women Congress protest against petrol chaos gas price hike:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.