महिला रक्षकांची झाली छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:29+5:302021-09-10T04:12:29+5:30

नागपूर : मेयो रुग्णालयात तैनात महाराष्ट्र सुरक्षारक्षक दलाच्या इतर महिला गार्ड सुपरवायझरच्या छेडखानीच्या शिकार झाल्याची माहिती आहे. मेयो रुग्णालयाशी ...

Women guards were harassed | महिला रक्षकांची झाली छेडखानी

महिला रक्षकांची झाली छेडखानी

Next

नागपूर : मेयो रुग्णालयात तैनात महाराष्ट्र सुरक्षारक्षक दलाच्या इतर महिला गार्ड सुपरवायझरच्या छेडखानीच्या शिकार झाल्याची माहिती आहे. मेयो रुग्णालयाशी निगडित काही व्यक्ती पीडित महिला जवानांवर दबाव टाकून त्यांना तक्रार करण्यापासून रोखत आहेत. यामुळे ताज्या प्रकरणातील सत्यस्थिती पुढे येत नसल्याची स्थिती आहे.

हे प्रकरण ५ सप्टेंबरला समोर आले होते. पीडित २८ वर्षाच्या महिला गार्डच्या तक्रारीनुसार तिने पाटीलला एक दिवसाची सुटी मागितली. सुटीच्या मोबदल्यात पाटील नको ती मागणी करीत होता. यापूर्वीही स्वत:ऐवजी दुसऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी असे वर्तन केल्यामुळे पीडित महिला संतप्त झाली. तिने कुटुंबीयांशी चर्चा करून तहसील पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या चौकशीनंतर पोलिसांनी छेडखानी, धमकी देणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून पाटीलला अटक केली. सूत्रांनुसार पीडित महिलेच्या धर्तीवर इतर महिला गार्डही छेडखानीच्या शिकार झाल्या आहेत. परंतु पाटीलचे मेयो रुग्णालय आणि तेथील अधिकाऱ्यांशी मधूर संबंध असल्यामुळे कोणीच तक्रार करण्याची हिंमत करीत नाही. जानेवारी महिन्यात पीडितेची तक्रार पुढे आल्यानंतर पाटील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासात दोषी आढळला. त्यावेळी त्याची बदली करण्यात आली. मेयो रुग्णालयाच्या एका डॉक्टरने त्या आदेशावर अंमल करून त्याला कार्यमुक्त होऊ दिले नाही. त्यानंतर महिला गार्डने आपले तोंड बंद ठेवणे योग्य समजले. ५ सप्टेंबरला पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी काही महिलांची चौकशी केली असता महिलांनी पाटीलविरुद्ध तक्रार केली. पीडितांची संख्या वाढण्याच्या शंकेमुळे पाटीलचे संरक्षक डॉक्टरने दबाव टाकून इतर महिलांना शांत केले. त्यामुळे इतर प्रकरणे पुढे आली नाहीत. त्यांनी प्रकरणाचा बारकाईने तपास करून डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

...............

Web Title: Women guards were harassed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.