फटाके फोडू दिले नाही म्हणून नागपुरात महिलेला शिवीगाळ; घराची खिडकी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 03:28 PM2018-01-01T15:28:27+5:302018-01-01T15:28:48+5:30
नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर सारे शांत झाले असताना फटाके उडविणाºयाला हटकले म्हणून तिघांनी एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिच्या घराच्या खिडकीची काच फोडली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर सारे शांत झाले असताना फटाके उडविणाºयाला हटकले म्हणून तिघांनी एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिच्या घराच्या खिडकीची काच फोडली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात नवीन वर्षांच्या प्रारंभी ही घटना घडली. फिर्यादी महिलेच्या तक्र ारीनुसार, रविवारी मध्यरात्री मानकापूर परिसरातील नागरिकांनी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. आनंदोत्सव केल्यानंतर आवराआवर सुरू झाली. पीडित महिला आपल्या अंगणातून साहित्य घरात नेऊ लागली. सारे शांत झाल्यानंतर वस्तीत राहणारा आरोपी रजत मदरे (वय २१) फिर्यादी महिलेच्या घराजवळ आला आणि फटाके फोडू लागला. तिने त्याला मनाई केली असता आरोपी रजत आणि त्याच्या दोन साथीदारांनी तिचा हात पकडून तिला अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर तिच्या घराच्या खिडकीची काच फोडून तिला धमकी दिली. महिलेने मानकापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तिच्या तक्र ारीवरून विनयभंग करून मारहाण करण्याच्या आरोपाखाली रजत तसेच त्याच्या दोन साथीदारांविरु द्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.