महिलांनी न्यायाच्या संघर्षासाठी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 07:41 PM2018-03-03T19:41:29+5:302018-03-03T19:41:50+5:30
संविधनाने दिलेले अधिकार प्राप्त करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय कुटुंबाचे रक्षण करता येणार नाही. आमच्या अधिकारासाठी आम्हीच अशी भावना ठेवून सरकारविरुद्ध रस्त्यावर संघर्ष केल्याशिवाय आवाज बुलंद होणार नाही. तेव्हा आम्ही महिलांनी समाजात संविधानाविषयी जागृती केली पाहिजे, न्यायासाठी रस्त्यावर संघर्ष करून न्याय मिळवून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आदिमच्या नेत्या अॅड. नंदा पराते यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधनाने दिलेले अधिकार प्राप्त करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय कुटुंबाचे रक्षण करता येणार नाही. आमच्या अधिकारासाठी आम्हीच अशी भावना ठेवून सरकारविरुद्ध रस्त्यावर संघर्ष केल्याशिवाय आवाज बुलंद होणार नाही. तेव्हा आम्ही महिलांनी समाजात संविधानाविषयी जागृती केली पाहिजे, न्यायासाठी रस्त्यावर संघर्ष करून न्याय मिळवून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आदिमच्या नेत्या अॅड. नंदा पराते यांनी येथे केले.
राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे शनिवारी महाल येथील खोत सभागृहात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कमगार नेते विश्वनाथ आसई होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय धापोडकर, ओमप्रकाश पाठराबे, गजानन खोत, मनोहर घोराडकर, धनराज पखाले, शकुंतला वठ्ठिघरे, मंजू पराते, प्रमिला वाडीघरे आदी उपस्थित होते.
अॅड. पराते म्हणाल्या, लोकशाहीमध्ये महिलांच्या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांना धडकी बसेल. हलबा समाजाशी राजकारण करून निवडून येणाऱ्या आमदार, खासदारांचे राजकारण बंद करण्याची वेळ आली आहे. निवडणुकीमध्ये प्रत्येक महिलेने अन्यायाचा जाब विचारलाच पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विश्वनाथ आसई अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी महिलांनी संघटित होऊन एकता दाखविली पाहिजे. महिलांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष केला तरच न्याय मिळेत. आदिम समाजाला संविधानाने दिलेले अधिकार भाजपा सरकार काढून घेत आहे. या अन्यायग्रस्त आदिमांनी आपली शक्ती दाखवावी आणि जाब विचारावा, असे आवाहन त्यांनी केले.
गीता जळगावकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन अनिता हेडाऊ यांनी केले. मंदा शेंडे यांनी आभार मानले. लोकेश वट्टीघरे, सचिन बोरीकर, राधेश्याम बारापात्रे, निर्मला वरुडकर, रुपाली मोहाडीकर, वेणू पौनीकर, कल्पना मोहपेकर, चंद्रकला बारापात्रे, नलिनी भानुसे, कल्पना वट्टीघरे, सविता बुरडे, चंद्रकला इंजेवार, वैशाली चापरे, मीना पाठराबे, मनोज मौंदेकर, संध्या बोकडे, उर्मिला खानोलकर, शेवंता चिमूरकर आदी उपस्थित होते.