नागपुरात सीएए- एनआरसी विरोधात महिला उतरणार रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 08:50 PM2019-12-28T20:50:02+5:302019-12-28T20:50:28+5:30

सीएए आणि एनआरसी या कायद्याच्या निषेधार्थ आता नागपुरातील महिलांनीही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी दीक्षाभूमी येथे विविध धर्माच्या व समाजाच्या संघटनांच्या महिलांची प्रतिनिधिक स्वरुपात बैठक पार पडली.

Women will protest in Nagpur against CAA-NRC | नागपुरात सीएए- एनआरसी विरोधात महिला उतरणार रस्त्यावर 

नागपुरात सीएए- एनआरसी विरोधात महिला उतरणार रस्त्यावर 

Next
ठळक मुद्दे६ जानेवारीला संविधान चौकात धरणे : विविध समाजातील महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीएए आणि एनआरसी या कायद्याच्या निषेधार्थ आता नागपुरातील महिलांनीही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी दीक्षाभूमी येथे विविध धर्माच्या व समाजाच्या संघटनांच्या महिलांची प्रतिनिधिक स्वरुपात बैठक पार पडली. या बैठकीत येत्या ६ जानेवारी रोजी संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रबुद्ध महिला संघटना, रिपब्लिकन महिला ट्रस्ट, समता सैनिक दल, संविधान फाऊंडेशन, संजीवनी सखी संघ, राष्ट्रीय ओबीसी महिला, भारतीय मुस्लीम परिषद, चलो बुद्ध की और अभियान, आदिम, संबोदिनी महिला संघटना, अनाथपिंडक महिला परिवार, धम्मदिना वाचनालय, डॉ. आंबेडकर विद्यार्थी संघटना आदीसह विविध संघटनांच्यावतीने शनिवारी दीक्षाभूमी परिसरातील बोधीवृक्षाखली ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत या दोन्ही कायद्यावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर असे स्पष्ट झाले की, हे दोन्ही कायदे केवळ मुस्लीम विरोधी नसून ते एकूणच दलित, ओबीसी, भटके विमुक्ती, आदिवासींसह या देशातील गरीब लोकांविरुद्धचे षड्यंत्र आहे. तेव्हा या कायद्याला प्रखरतेने विरोध करून तो मागे घेण्यासाठी महिलांनीही रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ६ जानेवारी रोजी संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनामध्ये नागपुरातील सर्व समाज व धर्मातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. आंदोलनात कुणाचेही नेतृत्व राहणार नाही. भारताचा राष्ट्रध्वज आणि आम्ही भारताचे लोक या बॅनर अंतर्गत सर्व आंदोलनकर्त्या सहभागी होतील.
या बैठकीत छाया खोब्रागडे, डॉ. सरोज आगलावे, तक्षशीला वाघधरे, अ‍ॅड. स्मिता कांबळे, डॉ. जलदा ढोके, वंदना जीवने, ज्योती खोब्रागडे, शीला इंगळे, लता म्हैसकर, ममता गौतम, ममता बोदेले, सरोज बोदेले, समिता नंदेश्वर, चारुशीला गोस्वामी, निता मून, सुजाता गजभिये, ज्योती सोनटक्के, जयश्री सहारे, करुणा मून, सुगंधा खांडेकर, कल्पना कांबळे, सुरेखा लोकरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Web Title: Women will protest in Nagpur against CAA-NRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.