२४ मे रोजी ‘महिला आयोग’ आपल्या दारी
By admin | Published: May 22, 2016 02:49 AM2016-05-22T02:49:03+5:302016-05-22T02:49:03+5:30
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने २४ मे रोजी नागपूर येथे विभागीय जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
नागपूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने २४ मे रोजी नागपूर येथे विभागीय जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. रविभवन, शासकीय विश्राम गृह, सिव्हील लाईन, नागपूर येथे जनसुनावणी होईल.
महिला आयोगातर्फे २३ मे रोजी महापालिकेच्या तेजसिंहराव भोसले सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये महिलांविषयक कायदे, जेंडर सेन्सेटीव्हिटी आणि ग्रुप डिस्कशन अशी सत्रे होणार आहे.
यात मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील मान्यवर तज्ञ येणार आहे. या विषयाच्या संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.
सुनावणीदरम्यान, महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मिडीएटर म्हणून काम करणारे विविध सरकारी, खासगी संस्थातील व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत समुपदेशक तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस तक्रार निवारण समितीच्या सदस्या यांच्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
या जनसुनावणीस नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांच्या महिलांनी येऊन आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)