Women's Day 2019; ‘चॅलेंज’ स्वीकारा, यश मिळेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:37 AM2019-03-08T10:37:50+5:302019-03-08T10:39:19+5:30

महिलांनी स्वत:मधील सुप्तगुणांना वाव मिळवून द्यावा, आपले छंद जोपासावेत. हे छंद आपल्याला आनंद देतात, असे मत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी व्यक्त केले.

Women's Day 2019; Accept 'Challenge', achieve success! | Women's Day 2019; ‘चॅलेंज’ स्वीकारा, यश मिळेल!

Women's Day 2019; ‘चॅलेंज’ स्वीकारा, यश मिळेल!

Next
ठळक मुद्देउपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहाकणखर राहून निर्णयक्षमता सिद्ध करा

आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: 
महिलांना एकाचवेळी विविध भूमिका निभावाव्या लागतात. चॅलेंज आणि कर्तव्य म्हणून ते निभावण्याचा प्रयत्न आपण करतोय. नोकरी करीत असताना एक सपोर्ट सिस्टीम मिळाली तर महिला या अधिक चांगले काम करू शकतात. महिलांनी कणखर राहून आपली निर्णयक्षमता सिद्ध करावी.
एकाच वेळी विविध कामे करण्याची कला महिलांमध्ये असते. महिलांनी विशेषत: नोकरीपेशा महिलांनी घर आणि नोकरी सांभाळत असतानाच स्वत:कडेही लक्ष देण्याची गरज आहे. महिलांनी स्वत:मधील सुप्तगुणांना वाव मिळवून द्यावा, आपले छंद जोपासावेत. हे छंद आपल्याला आनंद देतात, असे मत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी व्यक्त केले.
राजलक्ष्मी शहा या मूळच्या कराड जि. सातारा येथील. वडील प्रोफेसर होते. घरचे वातावरण अतिशय चांगले होते. राजलक्ष्मी या अभ्यासात हुशार होत्या. दहावीला त्या पुणे विद्यापीठात मेरिटमध्ये आल्या होत्या. सातारा जिल्ह्यातून त्या पहिल्या होत्या. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणापासूनच पाहिले होते. त्यामुळेच दहावीत मेरिट येऊनही त्यांनी आर्टस्मध्ये प्रवेश घेतला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी इंग्लिश लिटरेचरमधून एम.ए. केले. त्यानंतर त्यांनी एमपीएससीची तयारी केली. १९९९ ला त्या सिलेक्ट झाल्या. उपजिल्हाधिकारी म्हणून पहिलीच नियुक्ती त्यांची नागपूरला झाली. नागपूर, वर्धा येथे काम करीत त्यांची पुन्हा नागपूरला बदली झाली. सध्या त्या नागपूरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. लवकरच निवडणुका होत आहेत. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून त्यांचे काम अधिकच वाढले आहे.
माझ्या जडणघडणीत माझ्या माहेरच्या मंडळींचा जितका रोल आहे, तितकाच माझ्या सासरच्या मंडळींचासुद्धा असल्याचे मोठ्या अभिमानाने राजलक्ष्मी शहा सांगतात.
शहा यांना पुस्तक वाचायची आवड आहे. मोटिव्हेशनल बुकपासून ते सर्वच प्रकारचे साहित्य त्यांना आवडते. त्या कामाने कितीही थकल्या तरी एखाद्या पुस्तकाची काही पाने वाचल्याशिवाय त्यांना झोप येत नसल्याचे त्या आवर्जून सांगतात. शास्त्रीय संगीत आणि नृत्याचीही त्यांना आवड आहे. छंद हे जोपासायला हवेत, ते आनंद देतात. असे त्यांचे मानणे आहे. म्हणूनच त्यांनी इतर महिलांना आणि विशेषत: नोकरीपेशा महिलांनी स्वत:कडेही आवर्जून लक्ष द्यावे, स्वत:चा छंद जोपासावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Women's Day 2019; Accept 'Challenge', achieve success!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.