Women's Day 2019; ध्येय, परिश्रमाने घडवले ‘आयएएस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:21 AM2019-03-08T10:21:57+5:302019-03-08T10:23:21+5:30

चिकाटी, परिश्रम आणि स्वबळावर आयएएस झाले. लिंगभेद हा लहानपणापासूनच अनुभवला. समाजात स्त्री-पुरुष समानता असावी, असे मत आहे राज्याच्या वस्त्रोद्योग विभागात संचालक पदावर कार्यरत डॉ. माधवी खोडे यांचे.

Women's Day 2019; Her Goal was 'IAS' | Women's Day 2019; ध्येय, परिश्रमाने घडवले ‘आयएएस’

Women's Day 2019; ध्येय, परिश्रमाने घडवले ‘आयएएस’

googlenewsNext
ठळक मुद्दे वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे-चवरेस्त्री-पु रुष समानता असावी

मोरेश्वर मानापुरे
नागपूर: घरात तीन बहिणी. मी तिसऱ्या क्रमांकाची. त्यामुळे मुलीने शिकलेच पाहिजे, असे घरी कधीही वाटले नाही. पण अभ्यासाशिवाय भवितव्य नाही, या ध्येयाने शिक्षणाला वाहून घेतले. चिकाटी, परिश्रम आणि स्वबळावर आयएएस झाले. लिंगभेद हा लहानपणापासूनच अनुभवला. समाजात स्त्री-पुरुष समानता असावी, असे मत आहे राज्याच्या वस्त्रोद्योग विभागात संचालक पदावर कार्यरत डॉ. माधवी खोडे यांचे.
खोडे म्हणाल्या, दहावीत अमरावती विभागात पाचवे मेरिट आणि बारावीत नागपूर विभाग व विदर्भात पहिला तर राज्यात मुलींमध्ये दुसरी मेरिट आले. बारावीत क्लासेसला सायकलने जायचे, तेव्हा कुणाचीही सोबत नव्हती. बारावीनंतर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसमध्ये प्रवेश घेताना वडील फीचे पैसे देण्यास तयार नव्हते. त्याकरिता मामांनी मदत केली. वैद्यकीय शिक्षण अत्यंत जिद्दीने पूर्ण केले. एमबीबीएसची पदवी सुवर्णपदकासह मिळविली. लग्नानंतर पती डॉ. सुरेश चवरे आणि कुटुंबीयांनी आयएएस होण्यासाठी सहकार्य केले. गायनिकमध्ये एमडी पूर्ण केले नाही. पण वर्ष-२००७ मध्ये आयएएस झाले. त्यावेळी महाराष्ट्रात टॉपर तर अखिल भारतीय स्तरावर २९ वी रँक मिळाली. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा आयुक्त, भंडारा जिल्हाधिकारी, अतिरिक्त आदिवासी आयुक्त या पदावर कार्य केले. या पदांवर कार्यरत असताना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत महिलांना प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. देशात मातेचे पूजन होते. आईनंतर स्त्रीला सन्मान मिळावा, अशी संवेदनशीलता समाजात नाही. आता कुठल्याही कार्यालयात महिला नोकरदारांची संख्या वाढली आहे. पण काम करताना पुरुषांचा अहंकार आडवा येतो. पुरुष सहकारी त्यांना चांगली वागणूक देणार नाही, तोपर्यंत कार्यालयातील काम सुरळीतपणे होणार नाही. मुलींना आरक्षणाची गरज नाही. त्याचा टक्का वाढला आहे. जे हातात आले, त्याचे सोने बनविण्याची ताकद असल्याचे डॉ. माधवी खोडे यांनी सांगितले.

Web Title: Women's Day 2019; Her Goal was 'IAS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.