आरोग्य शिबिराद्वारे महिला सप्ताहास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:09 AM2021-03-08T04:09:22+5:302021-03-08T04:09:22+5:30
नागपूर : जेसीआय नागपूर मेट्रोच्या वतीने महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाअंतर्गत दररोज सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले ...
नागपूर : जेसीआय नागपूर मेट्रोच्या वतीने महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाअंतर्गत दररोज सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे संयोजक आनंद शर्मा यांनी सांगितले. त्याच शृंखलेत प्रशासनाच्या नियमांचे पालन करत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. शिबिरात डॉ. राकेश ढाका यांनी रुग्णांची तपासणी करत त्यांना मार्गदर्शन केले. जेसीआय सदस्यांनी रक्तदान करत सामाजिक कर्तव्य पार पाडले. यासोबतच शिवनगर, खामला येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत प्रतापनगर, भेंडे लेआऊट, स्वावलंबीनगर येथील महापुरुषांच्या प्रतिमांची स्वच्छता करण्यात आली. सॅल्यूट टू सायलेंट वर्कर कार्यक्रमात सैनिक, मनपा अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शेतकरी, डॉक्टरांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवाय, वृक्षारोपण अभियानही राबविण्यात येणार आहे. यावेळी उषा नांदेडकर, लोकेश नांदेडकर, किरण रडके, वैशाली वर्मा, मयूरी, सुमीत, महेश, लकिशा कुंदन, पुजेश पाटील उपस्थित होते.
---------------