अजब प्रकार : हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 08:32 PM2018-11-10T20:32:40+5:302018-11-10T20:37:14+5:30

दुचाकीस्वाराने हेल्मेट घालावे असा नियम आहे. परंतु कारचालकाने हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड ठोठावण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

Wonder case: Car driver penalties for not wearing helmet | अजब प्रकार : हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड

अजब प्रकार : हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड

Next
ठळक मुद्देआॅनलाईन चालानची अफलातून नोटीसबसपा प्रदेशाध्यक्ष साखरे यांच्यासोबत घडलेला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीस्वाराने हेल्मेट घालावे असा नियम आहे. परंतु कारचालकाने हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड ठोठावण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
१ जुलै २०१८ रोजी बसपा प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे हे आपल्या पक्षाच्या एमएच ४९/एएस ७७७७ क्रमांकाच्या इनोव्हा कारने जात असताना अग्रसेन चौक येथे सीसीटीव्हीने घेतलेल्या फोटोनुसार हेल्मेट घातलेले नाही, अशा प्रकारची नोटीस त्यांना वाहतूक विभागाने पाठवली आहे. कार चालविताना सीटबेल्ट लावणे अनिवार्य असल्याने त्यांनी व

चालकाने सीटबेल्ट लावला होता. मोटर वाहन कायदा कलम १२९ व १७७ अन्वये नागपूर शहर वाहतूक शाखा चेंबर ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी शुक्रवारी ही नोटीस पाठवून तडजोड शुल्क ५०० रुपये भरण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या बँक खात्याचा नंबरसुद्धा दिला. वाहतूक विभागाने पाठविलेल्या नोटीसमध्ये चक्क इनोव्हा कारचा फोटो असून हेल्मेट घातला नसल्याचा उल्लेख आहे.
बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे सध्या विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते नागपुरात आल्यानंतर त्यांना ही अफलातून नोटीस मिळाली.
पोलिसांनी ही नोटीस मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी व पैशाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अश्या प्रकारची घोडचूक यानंतर होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी बसपा प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे यांनी केली आहे.

 

Web Title: Wonder case: Car driver penalties for not wearing helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.