लाकूड वाहतुकीचा गोलमाल!

By admin | Published: May 7, 2014 03:02 AM2014-05-07T03:02:50+5:302014-05-07T14:04:13+5:30

लाकडाची अवैध कटाई करून, त्याची वाहतूक करणे हा वन विभागातील नेहमीचा धंदा झाला आहे. वन अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीने काही खसरा ठेकेदार...

Wood transport logħba! | लाकूड वाहतुकीचा गोलमाल!

लाकूड वाहतुकीचा गोलमाल!

Next

परवाना २३ नगांचा : वाहतूक मात्र ५३ नगांची

नागपूर : लाकडाची अवैध कटाई करून, त्याची वाहतूक करणे हा वन विभागातील नेहमीचा धंदा झाला आहे. वन अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीने काही खसरा ठेकेदार वर्षांनुवर्षांपासून हा गोरखधंदा करीत आले आहेत. वन विभागाने नुकतीच काही दिवसांपूर्वी अशाच एका लाकडाची अवैध वाहतूक करणार्‍या ट्रकविरुद्ध कारवाई केली आहे. परंतु काहीच दिवसांत संबंधित वन अधिकाऱ्यांनी ट्रकमालकाशी हातमिळवणी करून, तो ट्रक परस्पर सोडून दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी की, भंडारा येथील फिरत्या पथकाने काही दिवसांपूर्वी ट्रक क्रमांक एमएच ३१/डब्ल्यू / २८५६ याला लाकडाची अवैध वाहतूक करताना पकडले होते. या ट्रकची चौकशी केली असता, ट्रकचालकाकडे २३ लाकडाच्या नगाची वाहतूक करण्याचा परवाना होता. परंतु ट्रकमधील लाकडाची प्रत्यक्ष मोजणी केली असता, त्यात एकूण ५३ नग आढळून आले. यात जांभूळ झाडाचा एक नग, आजनाचे दोन नग व साजा लाकडाच्या ५0 नगांचा समावेश होता. विशेष म्हणजे, सर्व मालावर संबंधित वन अधिकार्‍यांच्या हॅँमरचे निशाणसुद्धा होते. यामुळे फिरत्या पथकाने तो ट्रक संपूर्ण मालासह जप्ती करून, त्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. परंतु काहीच दिवसांत त्या ट्रकमधील माल गडेगाव येथील डेपोत खाली करून, तो ट्रक परस्पर सोडून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान याची कुणी तरी वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) यांच्याकडे तक्रार केली. त्यावर पीसीसीएफ यांनी भंडारा येथील उप वनसंरक्षक विनय ठाकरे यांना अहवाल मागितला. मात्र गत चार महिन्यांपासून ठाकरे यांनी तो अहवाल दिला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. यासंबंधी उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा दूरध्वनी बंद असल्याने तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Wood transport logħba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.