बुधला-लोहगड मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:48+5:302021-03-28T04:08:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : तालुक्यातील बुधला-लाेहगड मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, हे काम निकृष्ट प्रतिचे करण्यात येत असल्याने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यातील बुधला-लाेहगड मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, हे काम निकृष्ट प्रतिचे करण्यात येत असल्याने त्याची निरपेक्ष चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मनाेज तालेवार यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.
बुधला-लाेहगड या सात किमी अंतराच्या राेडची दैनावस्था झाल्याने दुरुस्तीची वारंवार मागणी करण्यात आली हाेती. त्यामुळे प्रशासनाने या मार्गाच्या दुरुस्ती कामाला मंजुरी देत त्यासाठी विशेष दुरुस्ती अनुदानातून दाेन काेटी रुपयांचा निधी मंजूर केला. कंत्राटदाराने या निधीतून या राेडवरील खड्डे बुजवायला सुरुवात केली. मात्र, खड्डे बुजवीत असताना राेडच्या सपाटीकरणाकडे लक्षच दिले नाही.
काही भागात डांबराचा थर पातळ तर काही भागात जाड टाकण्यात आला आहे. त्यामुळे हा राेड उंच सखल झाला आहे. या राेडवरून वाहने चालविताना त्रास हाेत असल्याने तसेच राेड दुरुस्तीचे काम निकृष्ट प्रतिचे करण्यात आल्याने त्याची चाैकशी करून कारवाई करण्याची तसेच या राेडचे काम दर्जेदार करण्याची मागणीही या तक्रारीत बुधला व लाेहगड ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
...
या सात किमी लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दाेन काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा राेड पूर्वी खूप खराब झाल्याने तसेच दुरुस्तीचे काम असल्याने खड्ड्यांचे पॅचेस भरण्यात आले. त्यानंतर रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याची गुणवत्ता नियमानुसार बराेबर आहे.
- ऋषिकेेश राऊत, अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, कळमेश्वर.