स्मशानभूमीचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:39 AM2021-02-05T04:39:08+5:302021-02-05T04:39:08+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : शहरात स्मशानभूमीचा अभाव असल्याने स्थानिक नागरिकांना लगतच्या कन्हान नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : शहरात स्मशानभूमीचा अभाव असल्याने स्थानिक नागरिकांना लगतच्या कन्हान नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. या प्रकारामुळे नदीतील पाणी दूषित हाेत असून, पुरामुळे नागरिकांना अडचणींना सामाेरे जावे लागते. ही समस्या कायमस्वरुपी साेडविण्यासाठी स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात केली. मात्र, कामाचा वेग संथ असल्याने काम पूर्णत्वास जाणार कधी, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
खापा शहरातील स्मशानभूमीला संजीवनी असे नाव देण्यात आले असून, स्मशानभूमीच्या निर्मितीसह परिसराच्या साैंदर्यीकरणाच्या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. या स्मशानभूमीचे काम अद्यापही पूर्णत्वास न गेल्याने स्थानिक नागरिकांना कन्हान नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे नदीचे पाणी दूषित हाेते. याच नदीच्या पाण्याचा वापर अनेक गावांमधील नागरिक पिण्यासाठी करीत असल्याने दूषित पाण्यामुळे त्यांच्या आराेग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, पावसाळ्यात नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करताना नागरिकांना विविध अडचणींना ताेंड द्यावे लागते. अंत्यसंस्कार करीत असताना अचानक पूर आल्यास नागरिकांची तारांबळ उडते. असे प्रकार अनेकदा घडले असून, त्यात प्राणहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस सुरू असल्यास लाकडे जाळण्यास त्रास हाेताे. त्यामुळे या स्मशानभूमीचे काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.