नागपूरच्या  सक्करदरा तलाव स्वच्छतेचे काम प्राधान्याने पूर्ण करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:04 AM2018-12-29T01:04:48+5:302018-12-29T01:05:54+5:30

सक्करदरा तलावाच्या पाण्यात झालेली जलपर्णी काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने घेतलेल्या पुढाकाराला महापालिकाही बळ देईल. या कामावर मनपाचे कर्मचारी वाढवून देण्यात येईल. लवकरात लवकर हे काम पूर्ण करा, असे निर्देश मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी नेहरूनगर झोनच्या अधिकाऱ्यांना दिले.

Work of cleaning of Sakkardara lake of Nagpur priority | नागपूरच्या  सक्करदरा तलाव स्वच्छतेचे काम प्राधान्याने पूर्ण करा 

नागपूरच्या  सक्करदरा तलाव स्वच्छतेचे काम प्राधान्याने पूर्ण करा 

Next
ठळक मुद्देआयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश : सुधाकर कोहळे यांच्यासह केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्करदरा तलावाच्या पाण्यात झालेली जलपर्णी काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने घेतलेल्या पुढाकाराला महापालिकाही बळ देईल. या कामावर मनपाचे कर्मचारी वाढवून देण्यात येईल. लवकरात लवकर हे काम पूर्ण करा, असे निर्देश मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी नेहरूनगर झोनच्या अधिकाऱ्यांना दिले.
क्लिन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने सक्करदरा तलावातील जलपर्णी काढून तलाव स्वच्छ करण्याचा संकल्प केला. २२ डिसेंबर रोजी या कार्याचा श्रीगणेशाही झाला. आतापर्यंत सुमारे ५० ट्रक जलपर्णी व कचरा तलावातून काढण्यात आला. या कार्यासाठी निधीची मागणी आ. सुधाकर कोहळे यांनी महापालिकेकडे केली होती. मात्र, अद्यापही तो निधी मिळाला नाही. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी आणि कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आ. कोहळे यांनी आयुक्तांसह सक्करदरा तलावाची शुक्रवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी निधी देण्यासह जलपर्णी काढण्यासाठी आवश्यक मशिनरी, हातमोजे व अन्य साहित्य महापालिकेने पुरवावे, अशी मागणी केली. यावर आयुक्तांनी सहमती दर्शवित २६ कर्मचाऱ्यांची टीम या कामावर दिली असल्याचे सांगितले. संबंधित निधी शुक्रवार सायंकाळपर्यंत मिळेल, असे आश्वासन दिले.
तलावातून येत असलेली दुर्गंधी नेमकी कशामुळे याचे कारण शोधून ती दूर करण्याचाही प्रयत्न महापालिका करेल. तलाव स्वच्छतेच्या कामात कुठलाही अडथळा येणार नाही, याची ग्वाहीही आयुक्त बांगर यांनी दिली.

Web Title: Work of cleaning of Sakkardara lake of Nagpur priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.