मातृ सेवा संघाच्या कार्याला समाजाचा अधिक सहभाग मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:07 AM2021-05-15T04:07:27+5:302021-05-15T04:07:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मातृ सेवा संघाचा इतिहास गौरवशाली आहे. महिलांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेच्या कार्याला समाजातील ...

The work of Matru Seva Sangh should get more participation of the society | मातृ सेवा संघाच्या कार्याला समाजाचा अधिक सहभाग मिळावा

मातृ सेवा संघाच्या कार्याला समाजाचा अधिक सहभाग मिळावा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मातृ सेवा संघाचा इतिहास गौरवशाली आहे. महिलांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेच्या कार्याला समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा अधिक सहभाग व प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. मातृ सेवा संघाला शुक्रवारी १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वर्धापन दिनाच्या आभासी कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अरुणा बाबुळकर, महासचिव डॉ. लता देशमुख, कोषाध्यक्ष वासंती देशपांडे उपस्थित होत्या. गडकरी म्हणाले, कमलाताई होस्पेट यांनी या संस्थेची स्थापना केली. महिलांच्या सेवेचा आदर्श त्यांनी प्रस्थापित केला. ज्या काळात महिलांनी पुढे येऊन काम करण्याची संधी नव्हती, त्या काळात कमलाताईंनी महिलांच्या उत्थानासाठी काम सुरु केले. त्यांचे जीवन प्रेरणादायी होते. आपले संपूर्ण जीवन त्यांनी समाजसेवेसाठी समर्पित केले होते. मातृ सेवा संघाचा इतिहास हा समाजसेवेचा इतिहास आहे. विदर्भातील तालुकास्थानी मातृ सेवा संघाचे कार्य पोहोचले आहे. हा इतिहास सर्वांना माहिती व्हावा म्हणून डॉ. वैशाली बेझलवार यांनी एका पुस्तकाच्या माध्यमातून हा इतिहास सर्वांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मातृसेवा संघाच्या या कार्याचे आगामी काळात भव्य स्वरूप पाहायला मिळेल. आता नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. याचा उपयोग करून मातृ सेवा संघाने आपली एक वेबसाईट तयार करून या कार्याची माहिती जनतेसमोर जावी यादृष्टीने विचार करावा व नवीन माध्यमांच्या साह्याने समाजापर्यंत पोहोचावे, असेही गडकरी म्हणाले.

Web Title: The work of Matru Seva Sangh should get more participation of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.