राज्य किटक मानचिन्हे निवडीच्या समितीचे कामकाज अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:07 AM2021-05-18T04:07:39+5:302021-05-18T04:07:39+5:30

नागपूर : राज्य प्राणी, राज्य पक्षी या धर्तीवर राज्य किटक मानचिन्हांची निवड करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे काम आता अंतिम ...

The work of the State Insect Standards Selection Committee is in its final stage | राज्य किटक मानचिन्हे निवडीच्या समितीचे कामकाज अंतिम टप्प्यात

राज्य किटक मानचिन्हे निवडीच्या समितीचे कामकाज अंतिम टप्प्यात

Next

नागपूर : राज्य प्राणी, राज्य पक्षी या धर्तीवर राज्य किटक मानचिन्हांची निवड करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. जून महिन्यात ही समिती आपला अहवाल देणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील दुर्मीळ जैवविविधतेसोबतच दुर्मीळ किटकांचे जतन व्हावे, त्यांचे अध्ययन करता यावे, यासाठी वनविभागाच्या पुढाकाराने या समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या स्थापनेला दोन महिने झाले असून, अहवाल देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या समितीमध्ये किटकशास्त्राचे अभ्यासक, वन्यजीव अभ्यासक, ज्येष्ठ वन अधिकारी यांचा समावेश आहे.

राज्यातील दुर्मीळ प्रजातींचे रक्षण व्हावे, त्यांचे वैशिष्ट्य अभ्यासकांना आणि पुढील पिढीला कळावे, पक्षी, प्राणी, किटकांच्या माध्यमातून होणाऱ्या जैवविविधतेचे रक्षण करण्यास साहाय्य व्हावे, यासाठी वनविभागाच्या पुढाकाराने मागील काही वर्षांत राज्य मानचिन्हे घोषित केली जात आहेत. अलीकडेच कांदळवनातील चिप्पी वृक्षाला मान्यता देण्यात आली. त्यापूर्वी राज्य फुलपाखरू घोषित करण्यात आले. या प्रक्रियेतील पुढील भाग म्हणून राज्य कीटक मानचिन्हांची निवड केली जाणार आहे.

...

कोट

ही समिती राज्यातील लहान किटकांचा अभ्यास करेल. दुर्मीळ असलेले आणि वेगळी वैशिष्ट्य असलेल्या किटकांची राज्य कीटक म्हणून निवड केली जाणार आहे. राज्यातील जैवविविधतेमध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत. निसर्गात या सर्वांचेच मोठे योगदान आहे. त्यांचे जतन व्हावे, पुढच्या पिढीमध्ये अभ्यासात्मक वृत्ती जागी व्हावी, जैवविविधतेचे संगोपन व्हावे, यासाठी हा प्रयत्न आहे.

- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

...

Web Title: The work of the State Insect Standards Selection Committee is in its final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.