देशाच्या विकासासाठी एकत्रित काम करावे
By admin | Published: January 25, 2017 02:49 AM2017-01-25T02:49:59+5:302017-01-25T02:49:59+5:30
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग आणि शैक्षणिक समुदायांना एकत्रित काम करण्याचे आवाहन
जगदीश रामास्वामी : वायसीसीईतर्फे ‘इंडिया अकॅडेमिया कॉन्क्लेव्ह’चे आयोजन
नागपूर : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग आणि शैक्षणिक समुदायांना एकत्रित काम करण्याचे आवाहन आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन प्रा.लि.चे अध्यक्ष (कॉर्पोरेट बिझनेस एक्सेलन्स) जगदीश रामास्वामी यांनी येथे केले.
मेघे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सच्या (एमजीआय) वायसीसीई यशवंतराव चव्हाण कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या(वायसीसीई)वतीने एक दिवसीय ‘इंडस्ट्री अकॅडेमिया कॉन्क्लेव्ह-२०१७’चे आयोजन २१ जानेवारीला कॉलेजमध्ये करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एनवायएसएसचे सचिव सागर मेघे होते.
प्रमुख अतिथी म्हणून जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट लिमिटेडचे अध्यक्ष दिलीप भट्ट, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या ग्लोबल वर्कफोर्स मॅनेजमेंटचे प्रमुख डॉ. के.एम. सुकीन्द्रन, विप्रो टेक्नॉलॉजिसचे नॅशनल कॅम्पस मॅनेजर विश्वनाथन वेणकता सुब्रमणियम, ब्रेन अॅण्ड कंपनीचे भागीदार हर्षवर्धन, इन्क्युबेशन सेंटर आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. मिलिंद अत्रे, वेबोनाईस सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा.लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष (एचआर अॅण्ड कल्चर) सच्चिदानंद कुळकर्णी, सीटीओ, केपीआयटी टेक्नॉलॉजीसचे सीटीओ वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. हेमंत पांडे आणि आयबीएम-इंडियाचे डिलेव्हरी प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह डॉ. अॅन्जेला कुरियन उपस्थित होते.
रामास्वामी म्हणाले, शासन, नागरिक, शिक्षण, उद्योग, सामाजिक स्वातंत्र्य देशाच्या विकासाचे पाच स्तंभ आहेत. या स्तंभांनी एकत्रित काम केल्यास देशाचा विकास होईल. परिषदेने उद्योग आणि शैक्षणिक समूहातील दरी दूर होईल.
सागर मेघे म्हणाले, विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा आणि उद्योगांना तयार राहावे, यासाठी एमजीआयने पुढाकार घेतला आहे. वायसीसीईचे प्राचार्य आणि कॉन्क्लेव्हचे चेअरमन डॉ. यू.पी. वाघे यांनी वायसीसीईच्या १९८४ या स्थापना वर्षांपासूनची उपलब्धी सांगितली. एमजीआय प्लेसमेंटचे संचालक आणि कॉन्क्लेव्हचे सचिव प्रा. जावेद शेख यांनी आयोजनाची उद्दिष्टे सांगितली. उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या सत्रात जगदीश रामास्वामी, दिलीप भट्ट, डॉ. मिलिंद अत्रे, डॉ. के.एम. सुकीन्द्रन, हर्षवर्धन या वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात ‘भारताच्या संक्रमण अर्थव्यवस्थेत युवकांना प्रशिक्षण’ या विषयावर डॉ. के.एम. सुकीन्द्रन, विश्वनाथ वेणकता सुब्रमणियम, सच्चिदानंद कुळकर्णी, डॉ. हेमंत पांडे, डॉ. अॅन्जेला कुरियन यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. प्रा. जावेद शेख आणि डॉ. वैशाली रहाटे यांनी दोन्ही चर्चासत्राचे संचालन केले. डीबीएसीईआरचे प्राचार्य डॉ. व्ही.एच. तत्त्ववादी, आरजीसीईआरचे प्राचार्य डॉ. ए.व्ही. बापट, डीएमआयईटीआरचे प्राचार्य डॉ. एस.पी. उंटवाले, डीएमआयएमएसचे संचालक डॉ. शायनी चीब, एमजीआयचे संचालक (प्रशिक्षण) शांतनू खंडेश्वर, वायसीसीईचे रजिस्ट्रार डॉ. पी.के. डाखोळे आणि वायसीसीईच्या अकॅडमिक मॅटरचे डीन डॉ. एस.डी. भोळे उपस्थित होते.(वा.प्र.)