ज्वेलर्समध्ये काम केले, पाच सेल्सगर्लने ७४ लाखांचे दागीने चोरून नेले
By दयानंद पाईकराव | Published: December 26, 2023 05:19 PM2023-12-26T17:19:43+5:302023-12-26T17:20:14+5:30
स्वाती लुटे, प्रिया राऊत, पुजा भनारकर, भाग्यश्री इंदलकर आणि कल्याणी खडतकर अशी गुन्हा दाखल झालेल्या सेल्सगर्लची नावे आहेत.
नागपूर : ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या पाच सेल्सगर्लने मालकालाच चुना लावत चार वर्षात ७४ लाख २५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तहसिल पोलिसांनी पाचही सेल्सगर्ल विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
स्वाती लुटे, प्रिया राऊत, पुजा भनारकर, भाग्यश्री इंदलकर आणि कल्याणी खडतकर अशी गुन्हा दाखल झालेल्या सेल्सगर्लची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंतनु दिपक चिमुरकर (वय २८, रा. नागमोडी ले आऊट, रेशीमबाग) यांचे इतवारी सराफा मार्केटमध्ये चिमुरकर ब्रदर्स नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात संबंधीत सेल्सगर्ल कार्यरत होत्या. सन २०१९ ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान चिमुरकर यांच्या दुकानातील ७४ लाख २५ हजाराचे सोन्या-चांदीचे दागीने या सेल्सगर्लने चोरी केले. ही बाब लक्षात आल्यानंतर दुकानाचे मालक शंतनु चिमुरकर यांनी तहसिल पोलिसात तक्रार दिली. तहसिल पोलिसांनी पाचही सेल्सगर्लविरुद्ध कलम ३८१ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.