स्लॅब टाकताना दुसऱ्या माळ्यावरून पडून कामगाराचा मृत्यू
By दयानंद पाईकराव | Published: March 2, 2024 07:34 PM2024-03-02T19:34:40+5:302024-03-02T19:35:07+5:30
लिफ्ट मशीनच्या डाल्यातून काँक्रीट काढताना त्याचा सेफ्टी बेल्ट लिफ्टच्या चेनमध्ये अडकला.
नागपूर : स्लॅब टाकताना लिफ्ट मशिनच्या डाल्यातून कॉंक्रीट काढताना सेफ्टी बेल्ट लिफ्टच्या चेनमध्ये अडकल्याने दुसऱ्या माळ्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. राजु लालसिंग मरकाम (२३, रा. शिवाजीनगर) असे मृत्यू झालेल्या बांधकाम कामगाराचे नाव आहे. तो अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पलासिया बिल्डींग येथे स्लॅबवर कॉंक्रीटींगचे काम करीत होता.
लिफ्ट मशीनच्या डाल्यातून काँक्रीट काढताना त्याचा सेफ्टी बेल्ट लिफ्टच्या चेनमध्ये अडकला. त्यामुळे तो लिफ्टच्या डाल्यासह दुसऱ्या माळ्यावरून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी राजेंद्रकुमार कैलास उईके (२०, रा. चिचोली, कनरागाव, जि. मंडला मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या सुचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.