एमआयडीसी बुटीबोरीतील कामगारांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:05 AM2020-11-29T04:05:22+5:302020-11-29T04:05:22+5:30
\S- संवाद कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांचे आवाहन : पर्यावरणपूरक वाहतुकीचा उपयोग करा नागपूर : जास्तीत जास्त नागरिकांनी नागपूर मेट्रो रेल्वे व ...
\S- संवाद कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांचे आवाहन : पर्यावरणपूरक वाहतुकीचा उपयोग करा
नागपूर : जास्तीत जास्त नागरिकांनी नागपूर मेट्रो रेल्वे व सार्वजनिक वाहतुकीचा वापर अंगीकृत करावा याकरिता महामेट्रोद्वारे नवीन योजना आखली असून अंमलबजावणीला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महामेट्रोने एमआयडीसी बुटीबोरी असोसिएशन येथे मेट्रो संवाद आयोजित केला होता. त्यात १०० पेक्षा जास्त असोसिएशनच्या सदस्यांनी भाग घेतला.
महामेट्रोने खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी व लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन येथून हिंगणा व जवळपासच्या परिसरात जाण्याकरिता फिडर सेवेंतर्गत बस सेवा सुरू केली आहे. बुटीबोरी एमआयडीसी या ठिकाणी शहरातून दररोज हजारो प्रवासी स्वत:च्या व अन्य वाहनाने ये-जा करतात. हा उपक्रम कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.
मेट्रो संवादमध्ये महामेट्रोतर्फे असोसिएशनच्या सदस्यांना परिवहन, मल्टिमॉडेल इंटिग्रेशनसंबंधी सादरीकरण आणि महाकार्डची माहिती देण्यात आली. कार्यरत कामगार व कर्मचारी मेट्रोचा उपयोग करतील याकरिता प्रोत्साहन करणार असून प्रत्येक महिन्याचा एक दिवस हा ग्रीन डे म्हणून साजरा करण्यासंबंधी सूचना केल्या. प्रत्येक कार्यात कर्मचारी शहरातून बुटीबोरी येथे येताना पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब करण्यासंबंधी घोषणा केली व जास्तीत जास्त कर्मचारी मेट्रोचा उपयोग करतील, असे आवाहन यावेळी करण्यात आले.