कार्यकर्त्यांनी एकजूट व्हावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:33 AM2017-10-13T01:33:18+5:302017-10-13T01:33:39+5:30
पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हातभार असतो. त्यामुळे पक्षसंघटन मजबूत होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हातभार असतो. त्यामुळे पक्षसंघटन मजबूत होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भाजपच्या नागपूर ग्रामीण तालुक्याची विस्तारित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बहादुरा येथे आयोजित कार्यक्रमाला डॉ. पोतदार, जिल्हा संघटनमंत्री श्रीकांत देशपांडे, महामंत्री किशोर रेवतकर, संजय टेकाडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अजय बोढारे, कामठी विधानसभा प्रमुख अनिल निधान, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी गायधने, रूपराव शिंगणे, डी. डी. सोनटक्के, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, डॉ. प्रीती मानमोडे, दिलीप नंदागवळी, रेखा मसराम, नगरसेविका स्वाती आखतकर, लीना हातीबेड, विद्या मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नरेश भोयर यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात महामंत्री पप्पू ठाकूर, सचिन घोडे, विजय नाखले, राजेंद्र राजूरकर, उपाध्यक्षपदी रवी गायधने, नारायण चिंचोने, प्रभाकर मेंढे, केशव सोनटक्के, नरेंद्र बानाईत, नरेंद्र नांदूरकर, सुरेश भोसकर, रत्नाकर काळबांडे, भाग्यश्री ठवकर, कैलास ठाकरे, माधुरी कांबळे, नारायण कापसे, योगेश पडोळे, कोषाध्यक्ष राजकुमार वंजारी, मंत्री संदीप खडसे, संजय जांगळे, रमेश कुरडकर, सचिन इंगळे, रमेश तिडके, गौतम कांबळे, कवडू ढगे, दीपक शिंदे, अमोल मेश्राम, पप्पू राऊत, वैशाली ढोणे, सुरेंद्र बानाईत, सोनू माकडे, बालू घोडमारे, विनोद मोरे, सतीश यादव, अनिल कडमकर, युवामोर्चा तालुकाध्यक्षपदी कपिल आदमने, महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी शुभांगी गायधने, अनुसूचित जाती तालुकाध्यक्षपदी चंद्रमणी नगरारे यांचा समावेश आहे.