मेट्रो रेल्वे : नागपुरात  ‘अ‍ॅक्वा लाईन’करिता कार्य वेगात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 09:00 PM2019-08-23T21:00:37+5:302019-08-23T21:02:01+5:30

हिंगणा मार्गावर १५ ऑगस्टला मेट्रोचे ट्रायल रन झाल्यानंतर लवकरच अ‍ॅक्वा लाईन सुरू करण्यासाठी महामेट्रोचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहे.

Working for 'Aqua Line' in Nagpur accelerated | मेट्रो रेल्वे : नागपुरात  ‘अ‍ॅक्वा लाईन’करिता कार्य वेगात 

मेट्रो रेल्वे : नागपुरात  ‘अ‍ॅक्वा लाईन’करिता कार्य वेगात 

Next
ठळक मुद्दे इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर ७०० कर्मचारी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : हिंगणा मार्गावर १५ ऑगस्टला मेट्रोचे ट्रायल रन झाल्यानंतर लवकरच अ‍ॅक्वा लाईन सुरू करण्यासाठी महामेट्रोचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहे. शहरातील अत्यंत व्यस्त ठिकाण म्हणजे सीताबर्डी परिसर आहे. या ठिकाणी आव्हानात्मक कार्य करण्यात येत आहे.
इंटरचेंज स्टेशनवरून खापरीपर्यंत मेट्रोची सेवा सुरू आहे. याच स्टेशनवरून लोकमान्यनगरपर्यंत अ‍ॅक्वा लाईन सुरूकरण्यात येणार आहे. यासाठी ७०० पेक्षा जास्त कामगार आणि अधिकारी कार्यरत आहेत. सामान्य नागरिकांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने जोखीम असलेले संपूर्ण कार्य रात्री ११ वाजतापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत करण्यात येत आहे. ३५० टन वजन क्षमतेच्या क्रेनच्या साहाय्याने कार्य पूर्ण केले जात आहे.
अ‍ॅक्वा लाईन आणि इंटरचेंज स्टेशनचे सीएमआरएसतर्फे परीक्षण करण्यात आले. याच्या काही दिवसांपूर्वी अ‍ॅक्वा लाईनवर २० मीटर लांबीचे स्टील गर्डर उभारण्यात आले. तसेच ४० मीटर लांबीचे कॉक्रिट बीमचे कार्य झाले आहे. पूर्व-पश्चिम अ‍ॅक्वा लाईनवर हायरग्रेड (३५०) गर्डर लावण्यात आले असून येथे प्लॅटफॉर्म तयार करण्याचे कार्य पूर्ण करण्यात येत आहे. इंटरचेंज स्टेशनवर अ‍ॅक्वा लाईन प्लॅटफार्मच्या रूफ शीट कार्यसाठी १०० आणि प्लॅटफार्मवर ग्रेनाईट लावण्यासाठी ५० कुशल कामगार कार्यरत आहे. टॉवर के्रनच्या साहाय्याने हे कार्य होत असून या क्रेनची क्षमता ९० टन आणि उंची ४० फूट आहे. जमिनीपासून २७ मीटर उंचीवर प्लॅटफार्म असणार आहे. रूफ शीटसह प्री-इंजिनिअरिंग बिल्डिंगचे (पीईबी) कार्य पूर्णत्वास आले आहे. अ‍ॅक्वा लाईनवर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यासंबंधी प्राथमिक कार्य जसे ट्रॅक, सिग्नलिंग, टेलिकॉम, यात्रीसुविधासंबंधी लिफ्ट आणि इतर कार्यदेखील अंतिम टप्प्यात आहे.

Web Title: Working for 'Aqua Line' in Nagpur accelerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.