डबलडेकर पुलाच्या कामाची स्थिती आश्वासनापेक्षा वेगळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:19+5:302021-07-12T04:07:19+5:30

वसीम कुरेशी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामठी रोडवर एलआयसी चाैक ते ऑटाेमाेटिव्ह चाैकांपर्यंत ५.३ किलोमीटरचे निर्माणाधीन डबलडेकर फ्लायओव्हरचे ...

The working condition of the doubledecker bridge is different than promised | डबलडेकर पुलाच्या कामाची स्थिती आश्वासनापेक्षा वेगळी

डबलडेकर पुलाच्या कामाची स्थिती आश्वासनापेक्षा वेगळी

googlenewsNext

वसीम कुरेशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कामठी रोडवर एलआयसी चाैक ते ऑटाेमाेटिव्ह चाैकांपर्यंत ५.३ किलोमीटरचे निर्माणाधीन डबलडेकर फ्लायओव्हरचे संथगतीने सुरू झालेल्या कामाचा वेग अद्यापही वाढलेला नाही. ८२ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा होत आहे. असाच दावा ऑक्टोबर-२०२० मध्येही करण्यात आला होता. प्रत्यक्षात तेव्हा ८० टक्के काम होणे बाकी होते. आता डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.

मेट्राेच्या रिच टू मध्ये एफ्काॅन्स कंपनीने नोव्हेंबर-२०१७ मध्ये डबलडेकर फ्लायओव्हरचे कंत्राट मिळवून काम सुरू केले होते. हे काम सुरू असतानाच रिच फोर आणि रिच थ्री चे काम पूर्ण झाले. आधी येथून फक्त फ्लायओव्हर करण्याचेच ठरले होते. नंतर मेट्राे प्रकल्पासोबत या कामाचे एकत्रिकरण झाले. प्रकल्पाच्या प्रारंभीच यावर बरीच चालढकल करण्यात आली होती. प्रकल्प २०१८ मध्ये आखण्यात आला. २०१९ मध्ये एनएचएआयची मंजुरी आणि निधी मिळाला, असे सांगितले जाते. या प्रकल्पाच्या हिशेबात झालेल्या बदलाबद्दल स्पष्टपणे बोलण्यास अधिकारी घाबरत आहेत.

...

प्रकल्पाशी संबंधित महत्वाचे मुद्दे

- ५७३ कोटी रुपये खर्चाचा हा डबलडेकर प्रकल्प नोव्हेंबर-२०१७ मध्ये सुरू झाला.

- २८ महिन्यात पूर्ण होणारा हा प्रकल्प ४५ महिन्यांतरही अपूर्णच आहे.

- इंदाेरा चाैकात वाहन चालकांना कनेक्टिंग द्यायचे होते, मात्र आराखड्याच्या प्रस्तावाला मंजुरीच नाही.

- लाॅकडाऊनदरम्यान काम बंद असतानाही आता दर रविवारी काम बंद असते.

- पाच महिने शिल्लक असताना अद्याप गुरूद्वाराजवळील आरयूबीवरील कामाला सुरुवातच नाही.

- एलआयसी चाैकत गिरीश हाईट्ससमोरील पुलाच्या लेव्हल एकचे काम अपूर्ण. आरयूबीच्या कामाला रेल्वेकडून विलंब.

- १३ ऑक्टोलर २०२० ला टेका नाका, माता मंदिराजवळील २७ फुट लांबीचा काँक्रीट सेग्मेंट तुटला होता.

-गड्डीगाेदाम चाैकातील स्टेशनचे काम संथ.

- रस्त्याच्या कामाला सुरुवातच नाही. एलआयसी चाैक ते गुरुद्वारापर्यंत मार्गाची चाळणी.

-एलआयसी चाैकाजवळ पुलाच्या लॅंंडिंग पाॅईंटवरील मार्गाचे रुंदीकरण बाकी.

- नारी स्टेशनचे काम अपूर्णच, पिल्लर उभारले.

- दिलेल्या आश्वासनापेक्षा कामठी राेड डबलडेकर फ्लायओवरचे काम १८ टक्केच बाकी.

Web Title: The working condition of the doubledecker bridge is different than promised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.