विद्याभारतीतर्फे कृतिशील शिक्षणावर कार्यशाळेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:07 AM2021-05-14T04:07:51+5:302021-05-14T04:07:51+5:30
गुरुवारी मराठी विषयाची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचा मुख्य उद्देश शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरण याविषयीची जाण होणे व त्याचप्रमाणे शिक्षणाच्या ...
गुरुवारी मराठी विषयाची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचा मुख्य उद्देश शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरण याविषयीची जाण होणे व त्याचप्रमाणे शिक्षणाच्या प्रवाहात वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन करून त्यांचे पुढील अध्ययन सुकर व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आली. सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ येथील डॉ. सोनाली हिंगे यांनी पीपीटी प्रेझेन्टेशन त्याचप्रमाणे ऑफलाइन, ऑनलाइन पद्धतीने हसतखेळत शिक्षण कसे होऊ शकते याच्या विविध कृती व प्रात्यक्षिक करून दाखवले. सोबतच कामठी जिल्हा परिषद शाळेतील वसंत गोमासे, संगीता काशीकर यांनीदेखील मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला नागपूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. सोबतच विद्याभारतीचे विदर्भ संघटन मंत्री शैलेश जाेशी, श्रीकांत देशपांडे, प्रकाश कापसे हेदेखील उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शुभ्रा राॅय व रोशन आगरकर यांनी केले तर डॉ. हिंगे यांनी आभार मानले.