किट्समध्ये ॲम्बेडेड सिस्टमवर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:04+5:302021-06-18T04:08:04+5:30
रामटेक : स्थानिक किट्समध्ये ‘रिसेंट ट्रेंड्स इन ॲम्बेडेड सिस्टीम’ या विषयावर तीन टप्प्यात १८ दिवसांचे ऑनलाइन इंडक्शन वर्कशॉप आयाेजित ...
रामटेक : स्थानिक किट्समध्ये ‘रिसेंट ट्रेंड्स इन ॲम्बेडेड सिस्टीम’ या विषयावर तीन टप्प्यात १८ दिवसांचे ऑनलाइन इंडक्शन वर्कशॉप आयाेजित करण्यात आले हाेते. हे वर्कशाॅप ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन’ विभागातर्फे व एआयसीटीई आणि आयएसटीई यांच्या संयुक्त विद्यामने १८ ते २४ मार्च, २७ मे ते २ जून आणि ९ ते १५ जून घेण्यात आले हाेते.
तिसऱ्या टप्प्यातील सहा दिवासीय कार्यशाळेचे उद्घाटन आयएसटीईचे कार्यकारी सचिव डी. डी. वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. एआयसीटीईचे संचालक कर्नल बी. व्यंकट यांच्या प्रमुख उपस्थितीत समाराेप झाला. यावेळी किट्स प्राचार्य डॉ. रामरतन लाल, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंकज आष्टनकर उपस्थित होते. प्रत्येकाचा जीवनशैलीमध्ये ॲम्बेडेड प्रणालीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या प्रणालीने इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, नेटवर्किंग, रोबोटिक्स क्षेत्रात अतिशय वेगाने प्रगती झाली. यांची उपकरणे कल्पनेपेक्षा वेगवान गतीने काम करतात. या कार्यशाळेतून अभियंत्यांना अपडेट तंत्रज्ञानाची माहिती मिळेल, असा विश्वासही अतिथींनी व्यक्त केला. कार्यशाळेत देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील ५०हून अधिक प्राध्यापक सहभागी झाले हाेते. यशस्वीतेसाठी आरटीईएस टीमचे प्रा. सुधीर खरड, प्रा. चंद्रशेखर कुर्वे, प्रा. वैशाली पांडे, प्रा. रूपाली सुरस्कर, प्रा. चंद्रकुमार थदानी, प्रा. प्रज्ञा गजभिये, प्रा. स्नेहल मलोडे, अर्चना महात्मे यांनी सहकार्य केले.