शीतलवाडी येथे जलसंधारण उपाययाेजना कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:46+5:302021-07-10T04:07:46+5:30

रामटेक : भूजल व विकास यंत्रणाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शीतलवाडी (परसोडा) (ता. रामटेक) येथील ग्रामसंवाद भवनात जलसंधारण उपाययोजना कार्यशाळेचे नुकतेच ...

Workshop on Water Conservation Measures at Sheetalwadi | शीतलवाडी येथे जलसंधारण उपाययाेजना कार्यशाळा

शीतलवाडी येथे जलसंधारण उपाययाेजना कार्यशाळा

Next

रामटेक : भूजल व विकास यंत्रणाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शीतलवाडी (परसोडा) (ता. रामटेक) येथील ग्रामसंवाद भवनात जलसंधारण उपाययोजना कार्यशाळेचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. यात जमिनीतील पाणी पातळी वाढविणे, जमिनीची धूप कमी करणे, वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे, त्यासाठी बांध तयार करणे, वृक्षाराेपण करणे, यासह अन्य उपाययाेजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यपालन (पंचायत) राजेंद्र भुयार यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे किटे, भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक माने तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, खंडविकास अधिकारी प्रदीप ब्रम्हनाेटे, माजी पं.स. सदस्य नरेंद्र बंधाटे, विस्तार अधिकारी अनिल रामटेके, कृषी विस्तार अधिकारी धनराज खोरगे, रामकृष्णा कुबडे, सुखदेवे उपस्थित हाेते. कार्यक्रमाला सरपंच मदन सावरकर, उपसरपंच विनोद सावरकर, ग्रामविकास अधिकारी काशीनाथ गायकवाड, धनराज पालीवार, जितेंद्र बेले, अविनाश चन्ने, पुरुषोत्तम मोहनकर, कविता गज्जलवार, पौर्णिमा गेडाम, पार्वती सूर्यवंशी, प्रफुल्ल डोंगरे यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.

Web Title: Workshop on Water Conservation Measures at Sheetalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.