महिला उद्योजकांसाठी कार्यशाळा
By admin | Published: March 6, 2017 02:14 AM2017-03-06T02:14:34+5:302017-03-06T02:14:34+5:30
तरुण महिला उद्योजक आणि नवउद्यमींसाठी ‘टाय’ आणि युनायटेड स्टेट प्रोत्साहन देण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे करण्यात आले आहे.
नागपूर : तरुण महिला उद्योजक आणि नवउद्यमींसाठी ‘टाय’ आणि युनायटेड स्टेट प्रोत्साहन देण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यातील पाच शहरांमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागपूरचा समावेश आहे.
टायच्या नागपूर महिला शाखेला या आयोजनाची संधी मिळाली असल्याची माहिती टायच्या महिला शाखा प्रमुख रिता अग्रवाल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या कार्यशाळेत नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि रायपूर येथून २५ उद्योजिकांची निवड करण्यात आली आहे. या महिला उद्योजकांना व्यवसायासंदर्भात मार्केटिंग, सेल्स, फायनान्स, एचआर आणि बेसिक बिझनेस टेक्निकची माहिती लिनलेक्सच्या सीईओ गुरींदर सिंग, क्रिस्टेन क्विन व ‘युबिज’ च्या संचालक जंखना कौर या देणार आहे. सकाळी १० वाजता कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य अतिथी विश्वास महाजन यांच्याहस्ते होणार आहे. देशभरातील पाच शहरात होणाऱ्या कार्यशाळेतून प्रत्येकी पाच उद्योजकांची निवड करून पुढच्या सहा महिन्यापर्यंत त्यांच्या व्यवसायाला गती मिळावी म्हणून त्यांना सातत्याने मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेसाठी राज्यभरातून ७० हुन अधिक अर्ज आले होते. परंतु ज्या २५ महिला उद्योजकांची यासाठी निवड करण्यात आली त्यात व्यवसाय सुरू करून ३ ते ४ वर्ष झालेल्या उद्योजिकांचा समावेश करण्यात आला असल्याचे रिता अग्रवाल यांनी सांगितले. पत्रपरिषदेला टायचे शशिकांत चौधरी, जयंत चोपडे, संखला कौर, स्वाती ठक्कर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)