आयएएस, आयपीएस ध्येय असणाऱ्यांसाठी कार्यशाळा

By admin | Published: January 2, 2017 02:26 AM2017-01-02T02:26:27+5:302017-01-02T02:26:27+5:30

आजच्या तरुण पिढीपुढे आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी यासारख्या सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या

Workshops for IAS, IPS goals | आयएएस, आयपीएस ध्येय असणाऱ्यांसाठी कार्यशाळा

आयएएस, आयपीएस ध्येय असणाऱ्यांसाठी कार्यशाळा

Next

८ जानेवारी रोजी मोफत आयोजन :
लोकमत युवा नेक्स्ट व अ‍ॅग्ररिअनच्या राठोड अकॅडमीचा उपक्रम
नागपूर : आजच्या तरुण पिढीपुढे आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी यासारख्या सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता भरपूर सुवर्णसंधी आहेत. या सेवेत जाण्याकरिता या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. याच अनुषंगाने लोकमत युवा नेक्स्ट व अ‍ॅग्ररिअन राठोड अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमाने आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपीचे ध्येय बाळगणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकरिता मोफत कार्यशाळेचे आयोजन ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत तज्ज्ञ मंडळीतर्फे या विषयाची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता पाचवी ते बारावी, अंडर ग्रॅज्युएट व ग्रॅज्युएटपर्यंतच्या सर्व विद्यार्थी पालकांकरिता या परीक्षा संदर्भातील गैरसमज, शालेय जीवनापासूनच या परीक्षांची तयारी अशा महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ व्यक्तीमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्व प्रथम विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या या परीक्षासंदर्भातील मानसिक तयारी व्हावी, या दृष्टीने युपीएससी, एमपीएससीची ओळख करून देण्यात येईल तसेच युपीएससी सिव्हील सर्व्हिस परीक्षा व एमपीएससी राज्यसेवा परीक्षांमधून असणारे विविध प्रकारचे नोकरीचे पर्याय आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर या परीक्षेला लागणारी पात्रता, परीक्षेचे वेळापत्रक, या परीक्षेची संरचना व अभ्यासक्रम या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. तर मग काय, इयत्ता पाचवी ते ग्रॅज्युएटपर्यंतचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक या मोफत कार्यशाळेकरिता निमंत्रित आहेत.
नावनोंदणीकरिता विद्यार्थ्यांनी अनुश्री बक्षी ९८२२४०६५६२, राठोड सर ७७५६०३६५३८ या मोबाईल क्रमांकावर किंवा लोकमत भवन, रामदासपेठ येथे संपर्क संपर्क करून आपली जागा राखीव करून घ्यावी. (प्रतिनिधी)

Web Title: Workshops for IAS, IPS goals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.