मासिक पाळीतील ‘वेस्ट मॅनेजमेन्ट’वर ‘नीरी’त कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 19:50 IST2018-06-14T19:49:25+5:302018-06-14T19:50:39+5:30

‘सीएसआयआर-नीरी’तर्फे मासिक पाळीच्या दिवसात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार १२ जून रोजी आयोजित या कार्यशाळेला महापौर नंदा जिचकार या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मासिक पाळीदरम्यान निर्माण होणारा ‘पॅड्स’च्या कचऱ्याचे व्यवस्थापन, त्याची आवश्यकता इत्यादीसंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तांत्रिकदृष्ट्यादेखील अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. शिक्षणसंस्था, संशोधन संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांमधून प्रतिनिधी यात सहभागी झाले होते.

Workshops in Neeri on 'West Management' in menstrual cycle | मासिक पाळीतील ‘वेस्ट मॅनेजमेन्ट’वर ‘नीरी’त कार्यशाळा

मासिक पाळीतील ‘वेस्ट मॅनेजमेन्ट’वर ‘नीरी’त कार्यशाळा

ठळक मुद्देसीएसआयआर-नीरी’ने केले ‘बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स’ विकसित

लोकमत न्यूज  नेटवर्क 
नागपूर :‘सीएसआयआर-नीरी’तर्फे मासिक पाळीच्या दिवसात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार १२ जून रोजी आयोजित या कार्यशाळेला महापौर नंदा जिचकार या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मासिक पाळीदरम्यान निर्माण होणारा ‘पॅड्स’च्या कचऱ्याचे व्यवस्थापन, त्याची आवश्यकता इत्यादीसंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तांत्रिकदृष्ट्यादेखील अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. शिक्षणसंस्था, संशोधन संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांमधून प्रतिनिधी यात सहभागी झाले होते.
‘नीरी’ व ‘स्वच्छ’ या स्वयंसेवी संस्थेने मासिक पाळीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याची समाजाला आवश्यकता आहे, असे मत नंदा जिचकार यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी ‘इनोव्हेटिव्ह सिस्टीम्स’च्या प्रमुख डॉ.विजयालक्ष्मी, ‘रेड’च्या तज्ज्ञ डिन मेन्झिस, ‘स्वच्छ’ स्वयंसेवी संस्थेच्या अनसूया छाबराणी-काळे, ‘सीसीएसडी’च्या लीना, ‘वरदान’च्या कार्यकारी संचालक वासंती देशपांडे, ‘सीएसआयआर-नीरी’च्या मुख्य वैज्ञानिक साधना रायलू, मुख्य वैज्ञानिक डॉ.एन.एन.वैद्य, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ.नितीन लाभसेटवार तसेच ‘आरएमओ’ डॉ.शिल्पा परांजपे यांनी या विषयाच्या विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. यावेळी नगरसेविका प्रगती पाटील, दिव्या धोटे, ‘नीरी’च्या वैज्ञानिक डॉ.रीमा बिस्वास, शिल्पा कुमारी यादेखील उपस्थित होत्या.
या कार्यशाळेदरम्यान ‘सीएसआयआर-नीरी’ने विकसित केलेल्या ‘बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स’बाबत माहिती देण्यात आली. हे ‘नॅपकिन्स’ स्वस्त असून याचे विघटन सहज शक्य आहे असे सांगण्यात आले.

Web Title: Workshops in Neeri on 'West Management' in menstrual cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.