जागतिक वातरोग दिवस; वातरोगाचा फुफ्फुस, हृदय, मेंदूवरही परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:07 AM2018-10-12T11:07:58+5:302018-10-12T11:12:41+5:30

वातरोग हा सांधे व स्नायू याशिवाय डोळे, फुफ्फुस, हृदय, मणका, मेंदू आदी अवयवांवरही कधी कधी परिणाम करू शकतो. परंतु या सर्वांवर उपचार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. मिलिंद औरंगाबादकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

World arthritis Day; The result of the lung, heart, and brain on the vagina | जागतिक वातरोग दिवस; वातरोगाचा फुफ्फुस, हृदय, मेंदूवरही परिणाम

जागतिक वातरोग दिवस; वातरोगाचा फुफ्फुस, हृदय, मेंदूवरही परिणाम

Next
ठळक मुद्देमिलिंद औरंगाबादकरया रोगाबाबत गैरसमजच अधिक

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शरीररातील सांधे, स्नायू यांच्यावर विविध कारणांनी येणारी सूज व त्यामुळे होणारा त्रास म्हणजे वातरोग (आर्थायटिस). वातरोग हा सांधे व स्नायू याशिवाय डोळे, फुफ्फुस, हृदय, मणका, मेंदू आदी अवयवांवरही कधी कधी परिणाम करू शकतो. परंतु या सर्वांवर उपचार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. मिलिंद औरंगाबादकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
१२ आॅक्टोबर हा दिवस जागतिक वातरोग दिन म्हणून पाळला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. औरंगाबादकर म्हणाले, सगळ्यात जास्त आढळणारे वातरोग म्हणजे आमवात व संधिवात. अनुंवाशिक, व्हायरल इन्फेक्शन, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि हल्ली तरुण पिढीमध्ये असलेल्या खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा रोग बहुतेक रोग्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. परंतु काही रुग्णांमध्ये याचे कारणही समजत नाही.

वातरोगाबाबत समज कमीच
सामान्यांमध्ये वातरोगाबाबत समज कमी आणि गैरसमजच अधिक आहेत. यात मुख्य म्हणजे, हा रोग केवळ ज्येष्ठांनाच होतो, आई किंवा वडिलांना वात असेल तर मुलांनाही होतो, वात झाला म्हणजे सर्व संपले, कारण यावर काही औषधी नाहीत, आंबट खाल्ल्याने वात होतो, वात हा संसर्गजन्य रोग आहे, हा रोग झाल्याने मूलबाळ होत नाही, वातरोगामध्ये अ‍ॅलोपॅथीमध्ये केवळ वेदनाशामक औषधी व ‘स्टेरॉईड’च दिल्या जाते, युरिक अ‍ॅसिड वाढल्याने होणारा ‘गाऊट’ हा आजार मासिक पाळी नियमित सुरू असलेल्या स्त्रियांना होतो, असे अनेक गैरसमज आहेत. यामुळे काही रुग्ण योग्य उपचारापासून वंचित राहतात.
- डॉ. मिलिंद औरंगाबादकर

वातरोग लहान मुलांपासून वृद्धांना होऊ शकतो
वातरोग हा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कुणालाही होऊ शकतो, असे सांगत डॉ. औरंगाबादकर म्हणाले, वातरोगामध्ये अनुवांशिकतेचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे पालकांना झाला तर मुलांना होईलच असे नाही. विविध प्रकारच्या वातरोगांचे योग्य निदान झाल्यावर त्यावर अतिशय प्रभावी उपचारपद्धती ‘अ‍ॅलोपॅथी’मध्ये उपलब्ध आहे. वेदनाशामक व स्टेरॉईड ही वातरोगाची मुख्य औषधी नाहीत. वातरोग रुग्णांना मूलबाळ सामान्य होऊ शकते. केवळ सुरुवातीपासून काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. ‘गाऊट’ हा आजार रक्तातील युरिक अ‍ॅसिड वाढल्याने होऊ शकतो. परंतु तो ४५ वर्षांखालील स्त्रियांमध्ये दुर्मिळ आहे. मांसाहार व मद्यपानाच्या व्यसनाने ‘गाऊट’ व्हायची शक्यता अधिक असते.

‘आमवात’वर प्रभावी उपचार
डॉ. औरंगाबादकर म्हणाले, आपल्या विकृतींनी जीवन कष्टमय करणाऱ्या ‘आमवात’वर (आरए) अ‍ॅलोपॅथीमध्ये प्रभावी उपचार व औषधे उपलब्ध आहेत. या आजारात प्रामुख्याने छोटे सांधे दुखतात व त्यावर सूज येते. कधी कधी डोळे कोरडे होतात, श्वास घ्यायला त्रास होतो, हाताला मुंग्या येतात आदी समस्याही दिसून येतात.

वयाच्या ४५ नंतर आढळणारा संधिवात
संधिवात हा वयाच्या ४५ वर्षांनंतर प्रामुख्याने आढळतो. लठ्ठपणा, अनुवांशिकता, व्यायामाचा अभाव, सांध्यांना आधी झालेली इजा आदी याची कारणे आहेत. संधिवात प्रामुख्याने गुडघे व जांघेच्या सांधा यांना होतो. यामध्ये सांध्यामधील हाडांवरच्या आवरणाची झिज होते व हाडांवर हाडे घासल्याने चालायला त्रास व दुखणे असते. नियमित व्यायाम, वजन कमी करणे, फिजिओथेरपी घेणे, औषधे याशिवाय सांध्यामध्ये इंजक्शन घेणे आदी उपचार आहेत.

Web Title: World arthritis Day; The result of the lung, heart, and brain on the vagina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य