दीक्षाभूमीवर घडणार जागतिक बौद्ध संस्कृतीचे दर्शन

By Admin | Published: February 20, 2017 02:19 AM2017-02-20T02:19:01+5:302017-02-20T02:19:01+5:30

दरवर्षी प्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात जागतिक बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.

World Buddhist philosophy | दीक्षाभूमीवर घडणार जागतिक बौद्ध संस्कृतीचे दर्शन

दीक्षाभूमीवर घडणार जागतिक बौद्ध संस्कृतीचे दर्शन

googlenewsNext

आंतरराष्ट्रीय बुद्ध महोत्सव : चीनचे भदंत रेन दा यांच्या हस्ते २२ ला उद्घाटन
नागपूर : दरवर्षी प्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात जागतिक बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात भारतीय लोकनृत्यासह चिनी गीत, संगीत व नृत्याची मेजवानी नागपूरकर रसिकांना अनुभवता येणार आहे.
नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे आणि प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागलोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियर्स (बानाई) , बोशान झेंगझुऐ टेंपल शांगडोन चीन आणि नॅशनल फिल्म आर्किव्ह आॅफ इंडिया यांच्या सहकार्याने हा आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
नागपूर बुद्धिस्ट सेंटरचे अध्यक्ष धम्मचारी ऋतायुश, स्मारक समितीचे सदस्य विजय चिकाटे, डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. सुनील तलवारे, आणि धम्मचारी नागकेतू यांनी पत्रपरिषदेत याबाबत माहिती दिली. येत्या २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता चीनमधील बोशान झेंगझुए टेंपल शांगडोनचे भदंत रेन दा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी बौद्ध विद्वान डॉ. यो (तायवान) , लेखक, निर्देशक व अभिनेते तिगमांशू धुलिया, धम्मचारी लोकमित्र, भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदनंद फुलझेले, नॅशनल फिल्म आर्किव्हज आॅफ इंडियाचे प्रकाश मगदूम आणि आयकर विभागाचे सहआयुक्त अजय ढोके प्रमुख पाहुणे राहतील.
यानंतर २३ ते २६ फेब्रुवारीपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले तीन गुरू यांच्यावर रत्नमाला व्याख्यानमाला होईल. पहिल्या दिवशी संत कबीर यांच्यावर प्रसिद्ध विचारवंत कंवल भारती, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्यावर सुशीला मरोले आणि तथागत गौतम बुद्ध यांच्यावर धम्मचारी सुभूती (इंग्लंड) हे मार्गदर्शन करतील.
२४ ला महाकवि वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गझलांचा कार्यक्रम होईल. २६ ला सायंकाळी ७ वाजता समारोप होईल. यावेळी मुंबईचे आयकर आयुक्त सुबचन राम हे प्रमुख अतिथी राहतील.
याशिवाय २५ ला युवकांसाठी कार्यशाळा होईल. २६ ला बुद्धीला चालना देणारे कार्यक्रव तसेच धम्मचारी नागकेतू यांची ध्यान कार्यशाळा होईल. (प्रतिनिधी)

फिल्म फेस्टिव्हल व चिनी कलावंतांचा संगीतमय कार्यक्रम
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे फिल्म फेस्टिव्हल व कला प्रदर्शन हे आहे. नॅशनल फिल्म आर्किव्हज आॅफ इंडियाद्वारा पुरस्कृत तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित वृत्तचित्र व फिल्म दाखविण्यात येतील. प्रसिद्ध लेखक, निर्देशक व अभिनेते तिगमांशू धुलिया यांच्या हस्ते या फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. प्रख्यात चीन व भारतीय कलाकारांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. या कलावंतांशी संवादसुद्धा साधता येईल. तसेच चिनी कलावंतांचा अतिभव्य आंतरराष्ट्रीय चान टी म्युझिकल हा संगीयमय कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल.

Web Title: World Buddhist philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.