जागतिक कॅन्सर दिन : रॅली, पोस्टर प्रदर्शनामधून कॅन्सर जनजागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:30 PM2019-02-04T22:30:45+5:302019-02-04T22:32:32+5:30

कॅन्सरचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास कॅन्सर पूर्णत: बरा होतो. मृत्यूचा धोका टाळता येतो. उपचाराचा खर्च वाचतो, म्हणूनच जागतिक कॅन्सर दिनानिमित्त लोकांमध्ये या रोगाविषयी माहिती व्हावी, लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी, यासाठी सोमवारी राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल व विविध संस्थांच्यावतीने रॅली, पोस्टर प्रदर्शन, मानवी साखळी व विविध स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.

World Cancer Day: Cancer Awareness from Rally, Poster Display | जागतिक कॅन्सर दिन : रॅली, पोस्टर प्रदर्शनामधून कॅन्सर जनजागृती 

जागतिक कॅन्सर दिन : रॅली, पोस्टर प्रदर्शनामधून कॅन्सर जनजागृती 

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचा पुढाकार

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅन्सरचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास कॅन्सर पूर्णत: बरा होतो. मृत्यूचा धोका टाळता येतो. उपचाराचा खर्च वाचतो, म्हणूनच जागतिक कॅन्सर दिनानिमित्त लोकांमध्ये या रोगाविषयी माहिती व्हावी, लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी, यासाठी सोमवारी राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल व विविध संस्थांच्यावतीने रॅली, पोस्टर प्रदर्शन, मानवी साखळी व विविध स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
रॅलीला हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुब्रजित दासगुप्ता यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी ४५० वर डॉक्टर, परिचारिका, विविध संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलल्या कॅन्सर जनजागृतीचे फलक व घोषवाक्यांनी लक्ष वेधून घेतले. रॅलीचा समारोप हॉस्पिटलसमोर मानवी साखळी तयार करून झाला.
कॅन्सर जनजागृती पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सचे अध्यक्ष डॉ. हरीश वरभे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात डॉ. दासगुप्ता, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, डॉ. रामकृष्ण छांगाणी यांनी कॅन्सरसंबंधित विविध विषयांवर प्रकाश टाकला. आभार हॉस्पिटलचे सहायक संचालक डॉ. बी. के. शर्मा यांनी मानले. या उपक्रमाला कॅन्सर रिलीफ सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ ऑटोलारिंगोलॉजिस्ट ऑफ इंडिया, अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर ऑबेस्ट्रीक अ‍ॅण्ड गायनेकॉलॉजिकल सोसायटी, इंडियन डेन्टल असोसिएशन, असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया, शासकीय दंत महाविद्यालय, झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी, जेसीआय-मेडिकोज, लायन्स क्लब मेडिकोज, आयएमएस, एएमडब्ल्यूएन, नार्ची, लॉयन्स क्लब नागपूर, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय, मधुकराव महाकाळकर नर्सिंग स्कूल, शुअरटेक नर्सिंग कॉलेज, दळवी नर्सिंग कॉलेज, स्नेहांचल आणि हेडगेवार रक्तपेढी आदींनी सहकार्य केले.

Web Title: World Cancer Day: Cancer Awareness from Rally, Poster Display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.