नागपुरातील फुटाळ्यावर वर्ल्ड क्लास म्युझिकल फाऊंटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:57 AM2019-03-30T11:57:35+5:302019-03-30T12:00:01+5:30

फुटाळा तलाव आणि चौपाटीला लवकरच जागतिक स्तराचे रूप मिळणार आहे. फ्रान्सच्या क्रिस्टल कंपनीतर्फे ९४ म्युझिकल फाऊंटन लागणार असून हे फवारे आकर्षणाचे केंद्र ठरतील.

World class musical fountain on Futala lake in Nagpur | नागपुरातील फुटाळ्यावर वर्ल्ड क्लास म्युझिकल फाऊंटन

नागपुरातील फुटाळ्यावर वर्ल्ड क्लास म्युझिकल फाऊंटन

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यटक ऐकतील गुलजार यांचा आवाज, रेहमानचे संगीत फ्रान्सच्या क्रिस्टल ग्रुपचे ९४ फवारे लागणार

सैयद मोबीन।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुटाळा तलाव आणि चौपाटीला लवकरच जागतिक स्तराचे रूप मिळणार आहे. फ्रान्सच्या क्रिस्टल कंपनीतर्फे ९४ म्युझिकल फाऊंटन लागणार असून हे फवारे आकर्षणाचे केंद्र ठरतील. लाईट, साऊंड आणि मल्टीमीडिया शो लागणार असून हे स्थळ नागपूरचे महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल. हा प्रकल्प साकार होण्यासाठी जवळपास सव्वा वर्ष लागणार असून नागपूरकर २०२० पर्यंत या अनोख्या व्यवस्थेचा आनंद घेऊ शकतील.
म्युझिकल फाऊंटनची विशेषता म्हणजे ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार पद्मश्री ए.आर. रेहमान यांचे संगीत आणि गीतकार पद्मश्री गुलजार यांचा आवाज. फाऊंटनच्या साऊंड डिझाईनची जबाबदारी ऑस्कर विजेता पद्मश्री रसेल पुकुट्टी यांना सोपविण्यात आली आहे. थिया (टीएचआयए) पुरस्कार विजेता गुईलोम डफलट यांना फाऊंटन डिझाईनची जबाबदारी देण्यात आली आहे. तांत्रिक संचालक म्हणजे एमी पुरस्कार विजेता वाय. अल्फोन्स रॉय आणि सहा वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता राहिलेल्या आशा केलूनी या निर्मितीच्या क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून कार्य सांभाळणार आहेत. क्रिस्टल ग्रुपचे सीईओ मायकल अमान हे फाऊंटन प्रोडक्शन आणि इन्स्टॉलेशन करतील. यानुसार फुटाळा येथील वर्ल्ड क्लास म्युझिकल फाऊंटनच्या निर्मितीत विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सहभाग राहणार आहे.
सध्या या प्रकल्पाच्या डिझायनिंग व तांत्रिक बाबींवर कार्य सुरू आहे. लाईट आणि साऊंड मल्टीमीडिया शोबाबत मार्गदर्शन आणि संबंधित प्रस्तावासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेत म्युझिकल फाऊंटनच्या तांत्रिक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी समिती तयार करण्यात आली असून यामध्ये व्हीएनआयटीच्या तज्ज्ञांचा समावेश असल्याची माहिती आहे.

काम सुरू करण्यास लागला उशीर
म्युझिकल फाऊंटन प्रकल्पाला नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली मात्र पुढे हा प्रकल्प नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) कडे सोपविण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत २६ मार्च २०१८ ला झालेल्या एनएमआरडीएच्या दुसऱ्या बैठकीत या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यास उशीर लागत होता. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यानंतर प्रकल्पाच्या कामाला वेग आला.

अंबाझरीतही ‘मल्टिमीडिया शो’
फुटाळा तलावाच्या धर्तीवर अंबाझरी तलावावरही मल्टिमीडिया शो सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पावरही काम सुरू आहे. हा शो स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित असेल. यामुळे अंबाझरी तलावाचे रूपही बदलणार असून नागपूर आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांना या विहंगम दृश्याचा आनंद मिळेल व पर्यटकही आकर्षित होतील.

पाण्याच्या पडद्यावर नागपूरचा इतिहास
फुटाळा तलावावर ४५ बाय १३ मीटरचे पाण्याचे दोन पडदे तयार करण्यात येणार असून त्यावर नागपूर शहराचा इतिहास दृष्टीस पडेल. फ्रान्सच्या क्रिस्टल ग्रुपतर्फे ९४ फवारे लावण्यात येणार असून सर्वात उंच फवारा ५० मीटरचा राहणार आहे. याशिवाय ३५ मीटरचे ६३ आणि २५ मीटर उंचीपर्यंत पोहचणारे १० फवारे लावण्यात येतील.

Web Title: World class musical fountain on Futala lake in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.