वर्ल्ड क्लासचा केवळ ढोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:32 AM2017-10-23T01:32:20+5:302017-10-23T01:32:36+5:30

World class only drums! | वर्ल्ड क्लासचा केवळ ढोल!

वर्ल्ड क्लासचा केवळ ढोल!

Next
ठळक मुद्देरेल्वेस्थानकाला समस्यांचा घेराव : प्रशासनाला कधी येईल जाग ? प्रवाशांना मिळेनात सुविधा

सीसीटीव्ही कॅमेरा कधी लावणार?
मागील आठ वर्षांपासून रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. सध्या रेल्वेस्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची अवस्था वाईट असून, त्यात मॉनिटरवर काहीच दिसत नसल्याचे वास्तव आहे. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा रेल्वेस्थानकावर लावल्यास असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करणे सोयीचे होणार असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेस्थानकावर लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आहे.
ड्रॉप अ‍ॅन्ड गो झोनध्ये पार्किंग
रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात ड्रॉप अ‍ॅन्ड गो झोनच्या चार रांगा आहेत. प्रवाशांना रेल्वेस्थानकावर सोडल्यानंतर वाहनांनी तेथून निघून जाण्यासाठी ड्रॉप अ‍ॅन्ड गो झोनची व्यवस्था करण्यता आली आहे. परंतु या झोनचा वापर पार्किंगसाठी होताना दिसून येत आहे. या झोनमध्ये रेल्वेच्या अधिकाºयांची वाहने उभी राहत असून, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येथे वाहनांची पार्किंग करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उंदरांचा हैदोस, रेल्वे रुळाशेजारी वाहने
रेल्वेस्थानकावर रुळावर उंदरांची संख्या वाढली असून येथे मोठमोठ्या आकाराचे उंदीर फिरताना दिसतात. प्रवाशांनी फेकलेल्या भोजनाचे पाकिट, नाश्ता खाताना हे उंदीर दिसत असून त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. परंतु या बाबीकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. तर प्लॅटफार्म २, ३ आणि ४ शेजारी मुंबई एण्डकडील भागात अनेक रेल्वे कर्मचारी आपली वाहने रुळाच्या शेजारी उभे करत असल्याचे दृष्टीस पडले. या गंभीर बाबीकडे ‘लोकमत’ने अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले. परंतु वृत्त प्रकाशित झाल्यानंतर थातूर-मातूर कारवाई करून रेल्वे सुरक्षा दलाकडून ही वाहने काढून घेण्यात येतात. परंतु काही दिवसानंतर परिस्थिती जैसे थे होते. यामुळे कोणत्याही क्षणी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पार्किंगमध्ये वाहनांसाठी जागा अपुरी
रामझुल्याच्या खाली आरएमएस कार्यालयाच्या शेजारी रेल्वेचे टू व्हिलर पार्किंग आहे. ही जागा अतिशय अरुंद आहे. परंतु येथेही वाहने उभी करण्यासाठी पुरेसी जागा उपलब्ध नाही. येथे एका वाहनाच्या मागे दुसरे वाहन उभे करण्यात येते. त्यामुळे वाहन काढताना नागरिकांची दमछाक होते. रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारील चारचाकी वाहनांच्या पार्किंगमध्ये अपुरी जागा असल्यामुळे वाहनचालक आपली वाहने ड्रॉप अँड गो झोनमध्ये उभी करत असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
चोºयांचे प्रमाण वाढले
रेल्वेस्थानक आणि रेल्वेगाड्यात चोरीच्या घटना वाढत आहेत. रेल्वेस्थानकावर येणाºया प्रवाशांची पर्स, बॅग, मोबाईल, लॅपटॉप चोरीला गेल्याच्या घटना नेहमीच घडतात. अनेकदा आरक्षण कार्यालयात तिकीट काढताना रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांच्या खिशातील पाकिट असामाजिक तत्त्व पळवितात. बाजूलाच लोहमार्ग पोलीस ठाणे असूनही पोलीस चोरट्यांचा बंदोबस्त लावण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.

Web Title: World class only drums!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.