डिसेंबर २०२५ पर्यंत बणनार नागपूरचे वर्ल्ड क्लास स्टेशन; निर्भया योजनेंतर्गत रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

By नरेश डोंगरे | Published: February 2, 2024 10:13 PM2024-02-02T22:13:56+5:302024-02-02T22:14:14+5:30

विविध मार्गावर वंदे भारतचा प्रस्ताव देणार : महाव्यवस्थापक रामकरण यादव

World class station of Bannar Nagpur by December 2025 | डिसेंबर २०२५ पर्यंत बणनार नागपूरचे वर्ल्ड क्लास स्टेशन; निर्भया योजनेंतर्गत रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

डिसेंबर २०२५ पर्यंत बणनार नागपूरचे वर्ल्ड क्लास स्टेशन; निर्भया योजनेंतर्गत रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

नागपूर : डिसेंबर २०२५ पर्यंत नागपूरचे मुख्य रेल्वेस्थानक आणि मे २०२६ पर्यंत अजनीचे रेल्वेस्थानक वर्ल्ड क्लास बनेल. त्यासंबंधाने आवश्यक ते नियोजन झाले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी आज पत्रकारांना दिली. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाची जबाबदार स्विकारल्यानंतर आज त्यांनी बडनेरा, वर्धा, नागपूर भागातील रेल्वेच्या कामांची सुरक्षा तपासणी केली. रेल्वे मार्ग, स्थानकांच्या ईमारती, ब्रीज, रेल्वे फाटक, रेल्वे कॉलनी, तसेच अमृत भारत स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचे निरीक्षण केले. हे आटोपून नागपुरात परतल्यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रेल्वेतील प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करून संपूर्ण रेल्वेगाडीत केवळ चार किंवा पाच गार्ड राहतात, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, निर्भया योजनेंतर्गत रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. मात्र, कॅमेरे तसेच रेल्वे गाड्यांमध्ये केवळ सुरक्षा गार्ड वाढवून भागणार नाही. प्रत्येकांनी सतर्कता बाळगली तर रेल्वेतील गुन्हे आणि घटना टाळता येईल. रेल्वेगाड्या आणि स्थानकावर शहानिशा न करता कुणालाही ठेका पद्धतीने कामावर ठेवले जाते. त्यामुळे काही समाजकंटकही येथे काम करतात अन् त्यामुळे प्रवाशांच्या जानमालाला धोका निर्माण होतो, असे लक्षात आणून दिले असता त्यांनी या प्रकाराची नोंद घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येईल, असे म्हटले. नवीन गाडीच्या संबंधाने ते म्हणाले, नागपूर -पुणे आणि मुंबई मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्यांना मोठी मागणी आहे. नागपूरहून अयोध्या, पुणे, मुंबई्, हैदराबाद आदी मार्गावर वंदे भारत सुरू करण्यासंबंधीची मागणी आहे. त्यासंबंधाने विविध पैलू तपासून रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला जाईल. याशिवाय स्लिपर कोचेस, तिसरी आणि चाैथी लाईन आणि विविध प्रश्नही पत्रकार परिषदेत चर्चेला आले. यावेळी नागपूर विभागाचे व्यवस्थापक मनीष अग्रवाल, वरिष्ठ वाणीज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव आणि अन्य विभागप्रमूख उपस्थित होते.

वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वेमार्ग

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग कळंबपर्यंत पुर्ण झाला असून त्याचे उद्घाटन करून या मार्गावर रेल्वेगाडी चालविण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. दोन वेळा उद्घाटनाची तारिखही ठरली होती. मात्र ती रद्द झाली. तथापि, या फेब्रुवारीतच या मार्गाचे उद्घाटन होईल आणि वर्धा ते कळंब रेल्वेगाडी सुरू होईल, असेही यादव यांनी सांगितले.

फॉग डिटेक्टर कार्यरत, मात्र...

धुक्यामुळे रेल्वेगाड्यांना उशिर होतो. ते टाळण्यासाठी रेल्वे बोर्डाने मोठ्या प्रमाणात फॉग डिटेक्टर दिले. मात्र, तरीसुद्धा गाड्या उशिरा धावत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले असता ते म्हणाले, फॉग डिटेक्टरमुळे सिग्नल स्पष्ट दिसत असला तरी गाड्यांचा वेग मात्र मंदावेल, त्यामुळे गाडीला उशिर होईल.

नितनवरे प्रकरणाचा अहवाल १ महिन्यात

जानेवारी महिन्यात ट्रेन कंट्रोलर सुनील नितनवरे यांचा रेल्वे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यावेळी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावण्यात आला होता. त्यासंबंधाने चाैकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येण्यास आणखी एक महिना लागेल, असे यादव म्हणाले.

Web Title: World class station of Bannar Nagpur by December 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.