जागतिक नारळ दिन; जाणून घ्या नारळाबाबतच्या काही मजेशीर बाबी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 12:18 PM2020-09-02T12:18:04+5:302020-09-02T12:18:45+5:30

केवळ खाद्य व अखाद्य उपयोगांव्यतिरिक्त मानवी आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या या फळाविषयी जाणून घेऊ या काही विशेष व मजेशीर बाबी

World Coconut Day; Learn some fun things about coconut .. | जागतिक नारळ दिन; जाणून घ्या नारळाबाबतच्या काही मजेशीर बाबी..

जागतिक नारळ दिन; जाणून घ्या नारळाबाबतच्या काही मजेशीर बाबी..

googlenewsNext
ठळक मुद्देनारळाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक नारळ दिन २ सप्टेंबरला साजरा केला जातो

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: खाद्यपदार्थांपासून औषधांपर्यंत, पूजाविधीपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत आणि असे अगणित उपयोग असलेल्या नारळाचा आज दिवस. केवळ खाद्य व अखाद्य उपयोगांव्यतिरिक्त मानवी आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या या फळाविषयी जाणून घेऊ या काही विशेष व मजेशीर बाबी

  • कोकोनट हा नट नाही.. तो स्टोन फ्रूट आहे..
  • नारळाचे तेल हे अन्य कुठल्या फळाच्या तेलापेक्षा सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वात जास्त वापरले जाते..

 

  • नारळ हा समुद्रात कितीही दूरपर्यंत व कितीही दीर्घ काळ तरंगत जाऊ शकतो.. त्यांनतरही त्याचा रुजण्याचा गुणधर्म टिकून असतो.

 

  •  नारळाला कोकोनट हे नाव अर्धे पोर्तुगीज नावाड्यांनी तर अर्धे इंग्लंडमध्ये मिळाले आहे. १६ व्या शतकात जेव्हा या नावाड्यांनी हे फळ समुद्रकिनारी पाहिले तेव्हा त्याचे तीन डोळे त्यांना माणसाच्या दोन डोळे व एका नाकासारखे वाटले. शिवाय ते हंसऱ्या चेहऱ्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांनी त्याला कोको, म्हणजे हंसरा चेहरा असे संबोधू लागले. पुढे या नारळाचा प्रवेश इंग्लंडमध्ये झाला तेव्हा कोकोपुढे नट हा शब्द जोडला जाऊ लागला..

 

  •  काही देशांमध्ये नारळं तोडण्यासाठी माकडांना प्रशिक्षित केले जाते. ही माकडे नारळाच्या झाडावर चढून नारळे तोडून खाली टाकतात.
  • नारळाच्या पाण्याचा मनुष्याच्या रक्तातील प्लाझ्मासारखा काही काळ उपयोग वैद्यक क्षेत्रात केला जाऊ शकतो.

Web Title: World Coconut Day; Learn some fun things about coconut ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.