जागतिक पर्यावरण दिवस; २०११ पासून नागपुरात वृक्षगणनाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:22 AM2019-06-05T10:22:48+5:302019-06-05T10:23:31+5:30

राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षापासून वृक्षलागवडीचे अभियान राबविले जात आहे. या अभियानात महापालिकेचाही समावेश आहे आणि त्यानुसार पालिकेने तीन वर्षात १ लाखाच्यावर वृक्ष लागवड केल्याचा दावाही केला आहे. मात्र शहरात वृक्षांची संख्या किती याबाबत पालिकेला फारशी माहिती नाही.

World Environment Day; Since 2011 Nagpur has no tree census in Nagpur | जागतिक पर्यावरण दिवस; २०११ पासून नागपुरात वृक्षगणनाच नाही

जागतिक पर्यावरण दिवस; २०११ पासून नागपुरात वृक्षगणनाच नाही

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदूषण थांबवा ही थीम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: पर्यावरण संवर्धन हा वर्तमानातील सर्वांच्या चिंतेचा आणि सर्वात अगत्याचा विषय ठरला आहे. याचा विचार करून राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षापासून वृक्षलागवडीचे अभियान राबविले जात आहे. या अभियानात महापालिकेचाही समावेश आहे आणि त्यानुसार पालिकेने तीन वर्षात १ लाखाच्यावर वृक्ष लागवड केल्याचा दावाही केला आहे. मात्र शहरात वृक्षांची संख्या किती याबाबत पालिकेला फारशी माहिती नाही.
धक्कादायक म्हणजे महापालिकेने २०१०-११ मध्ये शहरात वृक्षगणना केली होती. त्यानंतर वृक्षगणनाच न झाल्याने सध्या काय स्थिती आहे, ही माहिती महापालिकेजवळ नाही.
शहराचा विचार करायचा झाल्यास शहरात मागील काही वर्षात १ लाख ८ हजार ९६८ झाडे लावण्यात आली असल्याची माहिती उद्यान विभागाकडून मिळाली. यामध्ये २०१६-१७ ला ३७,५५३, २०१७-१८ ला ३२,४७१ आणि २०१८-१९ ला ३८९४४ वृक्षांचा समावेश आहे. त्यातील ६३३४५ झाडे जगल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातही २६ हजार यावर्षीचेच आहेत. यादरम्यान इमारत, रस्ते बांधकाम, मेट्रो, उड्डानपुल आदी विकासकामांसाठी तीन वर्षात ४९०६ वृक्षांच्या तोडण्याची परवानगी महापालिकेच्या उद्यान विभागाने दिली आहे.
२०१०-११ ला झालेल्या वृक्षगणनेत २१ लाख वृक्षांची गणना झाली होती. त्यानंतर मात्र वृक्षगणना झाली नसल्याची उद्यान विभागाने दिली.
विश्वस्तरावर पर्यावरण जागृती व्हावी यासाठी विविध थीमवर पर्यावरण दिवस साजरा केला जातो. यंदा ‘वायूप्रदूषण थांबवा’ ही थीम ठेवण्यात आली आहे.

Web Title: World Environment Day; Since 2011 Nagpur has no tree census in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.