नागपूरचे कनोजिया यांच्याकडे जगप्रसिद्ध महात्मा गांधींचा दुर्मिळ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 08:01 PM2018-10-01T20:01:11+5:302018-10-01T20:10:33+5:30

महात्मा गांधी ही भारतातील एकमेव व्यक्ती होती, जी जगात सर्वात प्रसिद्ध होती. याची प्रचिती महालातील रूपकिशोर कनोजिया यांच्या झोपडीत येते. कनोजिया यांनी आपल्या झोपडीतच गांधीजींच्या दुर्मिळ साहित्याचा संग्रह केला आहे. जो नागपूरकरांसाठी अनोखा आहे. महात्मा गांधींची जगभरात असलेली कीर्ती याची जाणीव करून देणारा आहे.

World famous Mahatma Gandhi's rare assets with Kanojia of Nagpur | नागपूरचे कनोजिया यांच्याकडे जगप्रसिद्ध महात्मा गांधींचा दुर्मिळ ठेवा

नागपूरचे कनोजिया यांच्याकडे जगप्रसिद्ध महात्मा गांधींचा दुर्मिळ ठेवा

googlenewsNext
ठळक मुद्दे११६ देशांची डाकतिकीटेदेशात महात्मा गांधीवर निघालेली पहिली नोटगांधीजींचा मूळ फोटोही संग्रहात

 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा गांधी ही भारतातील एकमेव व्यक्ती होती, जी जगात सर्वात प्रसिद्ध होती. याची प्रचिती महालातील रूपकिशोर कनोजिया यांच्या झोपडीत येते. कनोजिया यांनी आपल्या झोपडीतच गांधीजींच्या दुर्मिळ साहित्याचा संग्रह केला आहे. जो नागपूरकरांसाठी अनोखा आहे. महात्मा गांधींची जगभरात असलेली कीर्ती याची जाणीव करून देणारा आहे.
रूपकिशोर कनोजिया हे प्रसिद्ध संग्राहक आहे. त्यांच्या या संग्रहात महात्मा गांधी यांचा बहुमूल्य ठेवा बघायला मिळतो. रूपकिशोर यांच्या मते जगात ११६ देशांनी महात्मा गांधी यांच्यावर पोस्टाची तिकिटे काढली आहेत. यातील बहुतांश तिकिटे रूपकिशोर यांच्या संग्रहात आहेत. तीही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आईसलॅण्डने महात्मा गांधींवर प्लास्टिकचे थ्रीडी तिकीट काढले आहे. जर्मनीने गांधीजींवर काढलेले पोस्टकार्ड, इंग्लंडने काढलेले फर्स्ट डे कव्हर, संयुक्त राष्ट्र संघाने २ आॅक्टोबर अहिंसा दिवस घोषित केल्यानंतर २००७ मध्ये स्पेशल कव्हर काढले होते. या सर्व डाक तिकिटांसह भारतामध्ये महात्मा गांधींवर निघालेल्या पहिल्या दीड आण्याच्या पोस्टाच्या तिकिटापासून तर १०० रुपयाचे खादीचे डाकतिकीट त्यांच्याकडे बघायला मिळते. भारताने १९४८ मध्ये काढलेले गांधीजींचे पहिले तिकीट, दांडीयात्रा, जन्मशताब्दी वर्ष, मीठाचा सत्याग्रह या चळवळींवर काढलेल्या तिकीट, मिनिचरशीट व फर्स्ट डे कव्हर आहे. भारतीय डाक विभागाने महात्मा गांधीचे काढलेले पहिले पोस्टकार्ड, महात्मा गांधींवर आंतरदेशीय पत्र, विविध राज्याने काढलेले पोस्टकार्ड हे त्यांच्या संग्रहात बघायला मिळते.
त्याचबरोबर महात्मा गांधींवर आजपर्यंत निघालेल्या सर्व नोटा. १९६९ मध्ये गांधी शताब्दी वर्षानिमित्त काढलेल्या १, २, ५, १० आणि १०० रुपयांच्या गांधींचा फोटो प्रिंट असलेल्या नोटा. खादी ग्रामोद्योगाने गांधीजींवर १९६१ मध्ये काढलेली २ रुपये व १० रुपयांची हुंडी. महात्मा गांधींजे दुर्मिळ व मूळ फोटो, चार्ली चॅप्लिनची गांधीजींशी भेट याचे मूळ फोटो त्यांच्या संग्रहात आहेत. १९७६ पासून रूपकिशोर महात्मा गांधींशी संबंधित वस्तूंचा संग्रह करीत आहे. बहुतांश कलेक्शन दुर्मिळ असल्याने त्यांची मागणी वाढली आहे.
अमूल्य ठेवा आहे
गांधीजींच्या कलेक्शनसाठी अख्खा देश फिरलो आहे. लाखो रुपये खर्च केले आहेत, तेव्हाच हा जगप्रसिद्ध ठेवा माझ्या संग्रहात आला आहे. तो माझ्यासाठी अमूल्य आहे.
रूपकिशोर कनोजिया, संग्राहक

Web Title: World famous Mahatma Gandhi's rare assets with Kanojia of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.