जागतिक परिचारिका दिन; उपराजधानीतील रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालणाऱ्या योद्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:17 AM2020-05-12T11:17:51+5:302020-05-12T11:18:18+5:30
आईच्याही आधी, बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते, नंतर जन्मभर रु ग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. कोविडच्या पार्श्वभूमीवरही ती मागे हटलेली नाही. कोरोनाच्या निदानाने भयभीत झालेल्या रुग्णांवर मायेची फुंकर घालून, त्यांची सुश्रृषा करणारी, धीर देणारी ती देवदूतच ठरली आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम तळहातावर सुरिक्षत उचलून घेणारी परिचारिका असते. आईच्याही आधी, बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते, नंतर जन्मभर रु ग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. कोविडच्या पार्श्वभूमीवरही ती मागे हटलेली नाही. कोरोनाच्या निदानाने भयभीत झालेल्या रुग्णांवर मायेची फुंकर घालून, त्यांची सुश्रृषा करणारी, धीर देणारी ती देवदूतच ठरली आहे.
मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलध्ये १२०वर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या सेवेत ५५ परिचारिका आहेत. कोरोनाबाधितांना सेवा देण्यात यांना कुठलीच भिती नाही. भिती आहे ती म्हणजे, तिच्यामुळे कुटुंबातील इतरांना आजाराची लागण होऊ नये याची. म्हणून ती खूप काळजी घेते. गुदमरून टाकणारे एन ९५ मास्क व प्लॅस्टिकच्या कव्हरने संपूर्ण अंग झाकून असलेली पीपीई किट सलग सात तास घालून राहते. या वेळात ती पाणी, भूख विसरलेली असते. रुग्णाना औषधोपचारच नाही तर त्यांना आजाराला घेऊन असलेली भिती दूर करण्याचा प्रयत्न करते. रोज या लढाईत या सर्व जण उतरतात. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर स्वत:लाच होम क्वारंटाइनही करून घेतात. मुलांनाही त्या जवळ येऊ देत नाहीत. दूरूनच त्यांना पाहून, आपले अश्रू लपवून धीर देतात. पुन्हा सर्व विसरून दुसºया दिवशी रुग्णालयात जातात. रोजचा हा संघर्ष त्यांचा सुरू आहे.
प्रत्येक नात्यात व्यवहार शोधणाºया आजच्या काळात नोकरीही फारच व्यावसायिक पद्धतीने केली जाते. परंतु नोकरीचे काही क्षेत्र असे आहेत ज्याच्यात सेवेला नजरेआड करताच येत नाही. नर्सिंग हे त्यातलेच एक क्षेत्र. या क्षेत्रात परिचारीका रूग्णाच्या केवळ जखमेवर मलमच लावत नाहीत तर मनावरच्या घावावर फुंकरही घालतात. या सत्कर्मात त्यांना तमा नसते वेळेची, पर्वा नसते स्वत:च्या सुखदु:खाची. याचा सुदंर आदर्शपाठ मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये परिचारिकांनी उभा केला आहे.
- मालती डोंगरे
मेट्रन, मेडिकल
रूग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम परिचारिका करतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वताच्या सुखदु:खाची. वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रूग्णसेवेत गुंतलेल्या असतात. अशा परिस्थीत अचानक घडलेल्या अनुचित घटनेला घाबरुन न जाता स्वत:चा जीव धोक्यातून घालून रुग्णांना वाचविण्याचाही त्या प्रयत्नही करतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज प्रत्येक परिचारिका घेत आहे.
-ज्योती पन्नागडे
त्या चिमुकल्यांच्या आईही झाल्या
कोविड वॉर्डात अनेक लहान मुले आहेत. वॉर्डात टिव्ही किंवा इतर मनोरंजनाचे साधने नाहीत. या रुग्णांना इतरांना भेटताही येत नाही. त्यांच्याशी संवाद साधणाºया