वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:09 AM2019-01-21T00:09:40+5:302019-01-21T00:12:24+5:30

चार दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा सोमवारी समारोप होत आहे.

The World Orange Festival concludes today | वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप

Next
ठळक मुद्देपुरस्कार वितरण, प्रगत शेतकऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा सोमवारी समारोप होत आहे.
रेशीमबाग मैदानावर दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमात मुख्य अतिथी ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित, आयसीएआर- सीसीआरआय नागपूरचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी पुरस्कार वितरण आणि प्रगत शेतकऱ्याचा सत्कार करण्यात येणार आहे.
संत्र्याचे शहर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या नागपुरात लोकमतच्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा भाग होणे ही गौरवाची बाब आहे. संत्र्याच्या उत्पादनात वाढ, आधुनिक तंत्रज्ञान आणि निर्यातीसाठी देश-विदेशातील कृषी तज्ज्ञांतर्फे शेतकऱ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून मिळालेले मार्गदर्शन हे फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य असल्याचे मत प्रदर्शनात आलेल्या शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
नागपूरकरांशी जुळल्याचा अभिमान
आयनॉक्सने नेहमीच तंत्रज्ञान, सेवा आणि आरामदायकतेवर नेहमीच लक्ष केंद्रित केले आहे. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा भागीदार म्हणून नागपूरकरांशी जुळल्याचा अभिमान आहे.
आयनॉक्स लेस्युअर लि.

 

Web Title: The World Orange Festival concludes today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.