वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ख्यातनाम सारा टोड यांनी शिकविले संत्र्याचे स्वादिष्ट पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 07:59 PM2017-12-17T19:59:48+5:302017-12-17T20:01:24+5:30

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ख्यातनाम व आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ सारा टोड यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी व पाककलेची आवड असणाऱ्या गृहिणींना संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करायचे याचे प्रात्याक्षिक करून दाखवले.

In The World Orange Festival, a delicious substance of orage taught by Sarah Todd | वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ख्यातनाम सारा टोड यांनी शिकविले संत्र्याचे स्वादिष्ट पदार्थ

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ख्यातनाम सारा टोड यांनी शिकविले संत्र्याचे स्वादिष्ट पदार्थ

Next
ठळक मुद्देआॅस्ट्रेलियन मास्टर शेफ : हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित

 ऑनलाईन लोकमत 
नागपूर : वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ख्यातनाम व आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ सारा टोड यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी व पाककलेची आवड असणाऱ्या गृहिणींना संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करायचे याचे प्रात्याक्षिक करून दाखवले. हा कार्यक्रम सदर येथील हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये झाला. कार्यक्रमात एलएडी, तिरपुडे व शासकीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमत मीडिया समूहाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे यांच्या हस्ते सारा टोड यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी लोकमत मीडिया समूहाचे उप-सरव्यवस्थापक आशिष जैन, अध्यक्ष (विक्री) करुण गेरा आदी उपस्थित होते. टोड यांच्या उत्साही व्यक्तिमत्त्वामुळे कार्यक्रम शेवटपर्यंत रंगतदार झाला. त्यात विद्यार्थ्यांच्या भन्नाट प्रतिसादाची भर पडली. टोड यांच्या प्रत्येक पाककृतीला विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली. टोड यांनी प्रत्येक पदार्थांत संत्र्याचा वापर केला. त्यांनी तयार केलेला प्रत्येक पदार्थ नवीन होता. ते पदार्थ त्यांनी स्वत:च्या कौशल्याचा उपयोग करून तयार केले. त्यांनी तयार केलेल्या पदार्थांची चव उपस्थितांना चाखायला मिळाली. प्रत्येक पदार्थ स्वादिष्ट व संत्र्याच्या आल्हाददायक चवीची अनुभूती देणारा होता. टोड यांना पदार्थ तयार करण्यासाठी दोन विद्यार्थिनींनी मदत केली.

नागपुरातील प्रसिद्ध पदार्थांची विचारणा
कार्यक्रमादरम्यान, टोड यांनी नागपुरातील प्रसिद्ध पदार्थांची माहिती विचारली. उपस्थितांनी त्यांना सावजी, संत्रा बर्फी व पाटवडीची माहिती देऊन हे पदार्थ एकदातरी चाखण्याचा आग्रह केला. त्यानंतर टोड यांनी हे पदार्थ खाऊनच परत जाईल असे सांगितले.

बजाज उपकरणांची प्रशंसा
टोड यांनी पदार्थ तयार करण्यासाठी बजाज उपकरणांचा उपयोग केला. त्यानंतर त्यांनी या उपकरणांची प्रशंसा केली. ही उपकरणे वापरण्यास सोपी आहेत. खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी अशी चांगली उपकरणे असणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

पाककला आवडता विषय
टोड यांनी पाककला हा त्यांचा आवडता विषय असल्याची माहिती दिली. खाद्य पदार्थ तयार करण्याची लहानपणापासूनच आवड आहे. त्यासाठी नेहमीच तत्पर असते. विद्यार्थीदशेत पाककला शिकण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: In The World Orange Festival, a delicious substance of orage taught by Sarah Todd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.