वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल :‘धम्माल गल्ली’त ओसंडला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 09:38 PM2019-01-20T21:38:35+5:302019-01-20T21:39:31+5:30

झुंबाच्या तालावर थिरकणारी पावले... तर कुणी गाण्यात मंत्रमुग्ध...तर कुनी नृत्याचे स्टेप्स शिकण्यात...तर रायफल शुटिंग... वन मिनिट शो...सापसिडी...जम्पर...कॅलिग्रॉफीमध्ये रममाण...तर कुणी जादूच्या खेळाने अचंबित...रॉक बॅण्डची धम्माल...सर्वत्रच नाचू या, गाऊ या, खिदळू या, बागडू या असे चित्र...अचानक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा फ्लॅश मॉब’... आणि एकच जल्लोष...नाचायला अख्खे मैदान कमी पडले. निमित्त होते लोकमतच्या पुढाकारात आयोजित ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’च्या माध्यमातून धमाल गल्लीचे. काँग्रेसगनर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर रविवारी प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवून घेतला.

World Orange Festival: In 'Dhammal Galli' flood of enthusiasm | वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल :‘धम्माल गल्ली’त ओसंडला उत्साह

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल :‘धम्माल गल्ली’त ओसंडला उत्साह

Next
ठळक मुद्देडीएनसी कॉलेजच्या मैदानावर झुंबा, गाणी, नृत्य, विविध खेळांत नागपूरकर रममाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झुंबाच्या तालावर थिरकणारी पावले... तर कुणी गाण्यात मंत्रमुग्ध...तर कुनी नृत्याचे स्टेप्स शिकण्यात...तर रायफल शुटिंग... वन मिनिट शो...सापसिडी...जम्पर...कॅलिग्रॉफीमध्ये रममाण...तर कुणी जादूच्या खेळाने अचंबित...रॉक बॅण्डची धम्माल...सर्वत्रच नाचू या, गाऊ या, खिदळू या, बागडू या असे चित्र...अचानक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा फ्लॅश मॉब’... आणि एकच जल्लोष...नाचायला अख्खे मैदान कमी पडले. निमित्त होते लोकमतच्या पुढाकारात आयोजित ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’च्या माध्यमातून धमाल गल्लीचे. काँग्रेसगनर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर रविवारी प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवून घेतला.
भल्या पहाटे गुलाबी थंडीतही डीएनसी कॉलेजच्या मैदानावर नागरिकांचे पावले वळली. यात बच्चे कंपनीपासून तर ज्येष्ठ नागरिकांनी देखील आपली हजेरी लावली. आपल्या आवडीचे खेळ अथवा साहित्य घेऊन आलेल्या नागपूरकरांनी आपल्यातील कला सादर करीत दुसऱ्यांनाही त्यांच्या कलेला प्रोत्साहन देत ‘रुटीन’च्या जरा पलीकडे जाऊन थोडा वेळ मनासारखे जगण्याची एक परंपरा जपली. डीजेच्या तालावर एम.जे. डेनीच्या सुरेल गाण्यांनी ‘धमाल गल्ली’ने सुरुवात झाली. झुंबा डान्सच्या माध्यमातून फिटनेसची प्रात्यक्षिके दाखवीत ते उपस्थितांकडून करवूनही घेतले. जम्पर, सापसिडी, बुलेट शूट, सेल्फी पॉईंट, ६० फूट बॅनरवर कॅलिग्रॉफी, स्केटिंग, ‘वेस्टपासून बेस्ट’ बनविण्याचे ‘आर्ट क्राफ्ट’, ‘मेट्रोची सेल्फी विथ विश वॉल’, जादूचे खेळ, सुपर डाक, चिपको आंदोलन नाटक, कुंभारकामाची ओळख असे एक ना अनेक खेळ, उपक्र म उपस्थितांना छंद पाहायला आणि प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळाला. धमाल गल्लीचे वैशिष्ट्य ठरले ते ‘मिरर मॅन’ व ‘पपेट शो’. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढून आपल्या आठवणींना मोबाईलमध्ये ‘सेव्ह’ करून घेतले. अनुजा घाडगे यांनी बहारदार संचालन केले.
‘झुंबा’ डान्सचा फिटनेस फंडा
‘प्रियदर्शनी लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च’, ‘जस्ट डान्स अकॅडमी’ व ‘व्हर्सस्टाईल’ आदी संस्थांनी झुंबा डान्सच्या माध्यमातून प्रणय देवतळे, आयुध किनेकर, विनोद घडसे, आशिष, झीन रोशन वऱ्हाडे, डॉ. शीतल क्षीरसागर, मेघा पराते, कल्याणी जुनघरे, तिथी जयस्वाल, झीन हरीश राऊत, झीन रागिणी, रिया, हिमानी, समृद्धी, दीपाली, प्रिया, नीती यांनी अरेबियन साँग, हॉलिवूड साँग, प्रोफेशनली ब्रीथनेसच्या माध्यमातून फिटनेसचे धडे देत उपस्थितांकडून ते करवून घेतले. झुंबावर चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच फेर धरला.
एक मिनिटात खाल्ली चार संत्री
‘वन मिनिट शो’मध्ये सखींनी भरभरून प्रतिसाद दिला. यात एका मिनिटात जास्तीत जास्त संत्री खाण्याच्या स्पर्धेत साधना जोध या महिलेने केवळ एका मिनिटात चार संत्री खाल्ली. दुसºया एका स्पर्धेत संत्र्याला सोलताना त्याचा तुकडा पडू न देण्याची स्पर्धा होती. यात स्मिता नारनवरे या महिलेने एका मिनिटात संत्र्याचे साल सलग सोलून काढले. अर्चना जैन यांनी एका मिनिटात संत्र्याची माळ बनविली. या ‘शो’चे संचालन नेहा जोशी व ऐश्वर्या मानकर यांनी केले.
मराठीचा फोक फिटनेस
‘टू स्टेप टीम’ने मराठीच्या गाण्यावर मधुमिता घुगरे हिने ‘फोक फिटनेस’ सुरू करताच एक जल्लोष झाला. यावेळी हडस हायस्कूल ‘सीबीएसई’ शाखेच्या ३५ वर विद्यार्थ्यांनी फेर धरत सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी हायस्कूलच्या प्राचार्य डॉ. प्राजक्ता गंगाखेडकर उपस्थित होत्या.
मुलीने फोडले कवेलू
‘ट्रेडिशनल मार्शल आर्ट कराटे असोसिएशन’चे सिंहान प्रवीण तिवारी यांच्या मार्गदर्शनात मार्शल आर्टचे थरारक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी केले. यात एका मुलीने पायाने कवेलू फोडले. यावेळी असोसिएशनने विशेषत: मुलीना स्वरक्षणाचे धडेही दिले.
आँख मारे ये लडकी आँख मारे
‘अंश’ रॉक बॅण्डवर ‘आँख मारे ये लडकी आँख मारे’ हे गीत सादर होताच तरुणांचा एकच जल्लोष झाला. एम.जे. डेनीने आपल्या अनोख्या शैलीत हे गीत सादर केले. त्यानंतर एकापेक्षा एक धमाल गीत सादर करीत तरुणांमध्ये उत्साह भरला. यावेळी १० वर्षांच्या मुलापासून ते ६० वर्षांच्या आजीने आपल्या गाण्याची हौस भागवून घेतली.
‘फ्लॅश मॉब’
‘फ्लॅश मॉब’मध्ये सर्वांसोबत नृत्य करताना टीम स्पिरिट दाखविण्याची संधी मिळताच अनेकांनी फेर धरला. ‘डान्स इट आऊट’चे अभिषेक गोयंका, आदेश शेख यांनी १० वर गाण्यावर ‘फ्लॅश मॉब’ सादर केला.
सुपर डार्ट गेममध्ये लावला निशाणा
धमाल गल्लीत तरुण-तरुणी, महिला अन् नागरिकांनी आपला निशाणा कितपत योग्य आहे, याचा अंदाज घेतला. अनेकांनी आपला अचूक निशाणा साधण्यासाठी प्रयत्न केला. ५० च्या आकड्यावर बॉल मारणाºयास इतर व्यक्ती दाद देत होते, तर चुकलेला निशाणा पुन्हा दुरूस्त करण्यासाठी अनेक जण वारंवार प्रयत्न करीत होते.
पेड लगाओ, पेड बचाओ
पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन म्हाळगीनगरचे विद्यार्थी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सरसावले. धमाल गल्लीत या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदरलाल बहुगुणा यांच्या चिपको आंदोलनावर एक नाटक सादर केले. नाटकातून ‘पेड लगाओ, पेड बचाओ’चा संदेश देण्यात आला. शुभांगी डावले, चेतना चव्हाण, दिव्या चव्हाण, संजना बोंडवे, काजल लांजेवार, समीक्षा मोहोड, अश्विनी पाखोडे, शिवानी बावणे, साक्षी माटे यांनी नाटकात भूमिका साकारून नागरिकांना झाडांचे रक्षण करण्याचा संदेश दिला.
कुंभारकामाचे घेतले धडे
धमाल गल्लीत जागनाथ बुधवारी कुंभारपुरा, पिवळी मारबत रोड येथील सुखराम वालदे या कुंभाराने मातीच्या गोळ्याला आकार देणारे चाक आणले होते. या चाकावर मातीचा गोळा ठेवून त्यापासून माठ, सुरई, फ्लॉवरपॉट, कुंड्या, पणत्या, ग्लास, गडवा कसा तयार करावा, हे प्रात्यक्षिक करून दाखविले.
ऑरेज प्लॅनेटमध्ये सेल्फीसाठी गर्दी
सेल्फी घेण्याची तरुणाईला चांगलीच हौस आहे. त्यामुळे ऑरेंज प्लॅनेट या सेल्फी पॉईंटवर तरुणाईने आपली हौस पूर्ण करण्यासाठी एकच गर्दी केली. येथे सेल्फी घेण्यासाठी ऑरेंज चष्मा, ऑरेंज रंगाची छत्री, टोपी, ज्यूस, ऑरेंज रंगाचे फूल, हार ठेवण्यात आला होता. तरुण-तरुणी या पॉईंटवर सेल्फी घेताना दिसले. अनेकांनी आपल्या ग्रुपसह या पॉईंटवर सेल्फीचा आनंद लुटला.
 मिरर मॅनचे आकर्षण
संपूर्ण शरीरावर काचेचा पोशाख परिधान केलेला मिरर मॅन धमाल गल्लीचे विशेष आक र्षण ठरला. पहाटेच्या बोचऱ्या थंडीत झुंबाच्या मंचावर अनेक जण ठेका घेत असताना हा मिरर मॅन अचानक प्रकट झाला आणि तोसुद्धा झुंबावर ताल धरू लागला. त्यामुळे अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. चमचम करणारा त्याचा पोशाख बघून अनेकांनी त्याच्यासोबत ठेका धरला, नंतर हा मिरर मॅन संपूर्ण धमाल गल्लीत फिरला. अनेकांशी शेकहॅण्ड केले. बऱ्याच जणांनी त्याच्यासोबत सेल्फी काढल्या.
 पपेट शोने लहानग्यांना रिझविले
धमाल गल्लीत मोठ्यांबरोबर लहानग्यांनीही आनंद लुटला. त्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी पपेट शो आयोजित करण्यात आला होता. डोरेमन, मिकीमाऊस, छोटा भीम, टायगर, संत्रा धमाल गल्लीत मनसोक्त हिंदळत होते. त्यांना बघून लहानग्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता. संगीताच्या तालावर थिरकून त्यांनी लहानग्यांना आनंद दिला.
 जम्पर, बुलेट शुटींग आणि सापसिडीवरही चिमुकल्यांची धूम
धम्माल गल्लीत छोट्या मुलांसाठी जम्पर ठेवण्यात आले होते. आई-वडील धमाल गल्लीत रंगले असताना, चिमुकले मात्र जम्परवर मनसोक्त आनंद लुटत होते. बंदुकीने फुगे फोडण्याचा आनंद तर लहानग्यांपासून मोठ्यांनीही घेतला. सहभागी युवती आणि महिलाही फुग्ग्यावर नेम धरत होत्या. सापसिडीचा खेळ चिमुकल्यांबरोबरच मोठ्यांनीही आनंद लुटला. येथे मोठेही आपल्या बालपणाचा आनंद लुटताना दिसून आले.
६० फुटाच्या कॅनव्हासवर कॅलिग्राफी
अक्षरायणतर्फे धम्माल गल्लीत ६० फुटाचा कॅनव्हास ठेवण्यात आला होता. यावर भिंतीला पेंटिंग करणाऱ्या ब्रशपासून चित्रकलेच्या ब्रशपर्यंत सर्वांचाच वापर करून कॅलिग्राफीच्या माध्यमातून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलला शुभेच्छा देत होते. राजीव चौधरी हे येथे येणाऱ्यांना विविध माध्यमातून कॅलिग्राफीही शिकवीत होते. ६० फुटाच्या संपूर्ण कॅनव्हासवर कॅलिग्राफीच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला.
स्केटिंगच्या माध्यमातून चित्तथरारक कसरती
साई स्पोर्टस् क्लब व नागपूर रोलर स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी स्केटिंगच्या माध्यमातून चित्तथरारक कसरती सादर करून उपस्थितांना अवाक् केले. लिंबो स्केटिंग, झिकझॅक स्केटिंग, टनल स्केटिंग यासारख्या थरारक कसरती सादर करून उपस्थितांच्या टाळ्या खेचल्या.
वेस्टपासून बेस्ट
सृजनचे संजय वानखेडे यांनी घरातील कचरा, वेस्ट मटेरियल आणून धमाल गल्लीत येणाऱ्यांकडून बेस्ट कसे करता येईल, याचे प्रशिक्षण दिले. वेस्ट मटेरियलपासून अनेकांनी लेटर बॉक्स, पेन बॉक्स बनविले. विद्यार्थ्यांचा या स्टॉलला

 

Web Title: World Orange Festival: In 'Dhammal Galli' flood of enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.